BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / डाळ तांदुळ रोल्स

Photo of Dal Chaval Rolls by Vaishali Joshi at BetterButter
0
5
0(0)
0

डाळ तांदुळ रोल्स

Jul-27-2018
Vaishali Joshi
300 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

डाळ तांदुळ रोल्स कृती बद्दल

चणा डाळ आणि तांदुळ पीठ पासून बनविलेली एक वेगळी रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टीमिंग
  • अकंपनीमेंट
  • लो फॅट

साहित्य सर्विंग: 4

  1. चणा डाळ १ कप
  2. तांदुळ पीठ १ १/२ कप
  3. आल लसूण मिर्ची जीरे पेस्ट ३ चमचे
  4. कोथिंबीर
  5. आमचूर १ चमचा
  6. हळद
  7. चिली फ्लेक्स १ चमचा
  8. मीठ
  9. मोहोरी
  10. करीपत्ता
  11. हिंग
  12. तेल

सूचना

  1. चणा डाळ ४ तास भिजवून घ्या आणि बाहेर काढून मिक्सर मधे पाणी न घालता वाटुन घ्या
  2. त्यात आल लसूण मिर्ची जीरे पेस्ट घाला , चिलिफ्लेक्स , हळद , मीठ आमचूर , २ चमचे तेल आणि कोथिंबीर घालून मिक्स करुन ठेवा
  3. त्याचे लांबट गोळे करुन घ्या
  4. तांदुळा चे पीठ मिठ घालून पाण्याने घट्ट सर भिजवून घ्या आणि खुप मळून घ्या
  5. त्या पिठाचे गोळे करून घ्या , एक गोळा घेवुन त्याची जाडसर पारी करा आणि त्यात डाळीचा लांबट गोळा ठेवून बंद करा .
  6. असे सगळे गोळे लांबट आकारात तयार करुन घ्या
  7. गैस वर एका कढईत पाणी टाकून उकळू द्या, ते उकळल्यावर त्यात हे बनवलेले रोल्स टाका आणि झाकून ठेवा
  8. थोड्या वेळात ते वर तरंगतील की गैस बंद करुन झार्याने काढून घ्या आणि थंड होउ द्या
  9. त्याचे १/२ इंच गोल गोल काप करुन घ्या
  10. पैन मधे तेल घाला
  11. मोहोरी , हिंग , करी पत्ता घालून सगळे काप त्यात फ्राय करा ,
  12. बस तयार डाळ तांदुळ रोल्स टिफिन मधून पोटात सोबत एखादी पातळ चटनी द्या

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर