समोसे | Samosas Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Samosas recipe in Marathi,समोसे, Shraddha Juwatkar
समोसेby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  6

  माणसांसाठी

1

0

About Samosas Recipe in Marathi

समोसे recipe

समोसे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Samosas Recipe in Marathi )

 • दोन कप मैदा
 • एक मोठा चमचा तूप
 • अर्धा चमचा बेकिंग पूड किंवा चिमुटभर सोडा
 • एक चमचा मीठ , थोडासा ओवा
 • एक कप मटार वाफवलेले
 • चार बटाटे उकडून बारीक चिरून
 • एक बारीक चिरलेला कांदा + कोथिंबीर एक मुठ + एक चमचा गरम मसाला + पाच-सहा मिरच्या यांचं मिश्रण
 • चवीनुसार मीठ
 • तेल

समोसे | How to make Samosas Recipe in Marathi

 1. मैदा , मीठ , ओवा बेकिंग पूड किंवा सोडा एकत्र चाळावं .  तूप घालून चांगलं चोळावं . 
 2. त्यात लागेल तसं पाणी घालून मऊ पीठ भिजवावं .  अर्धा तास झाकून ठेवावं . 
 3. एक मोठा चमचा तेल गरम करून त्यात जिरे घालावे .  त्यातच हिरव्या मिरच्याचे वाटण घालून खमंग परतावं, हळद घालून त्यात कांदा घालून थोडा शिजवून घ्यावा नंतर त्यात मटार,बटाटे , मीठ घालावं व सगळं नीट कालवावं.गरम मसाला पावडर घालून वरून कोथिंबीर घालावी. भाजी तयार झाली.
 4. पीठ पुन्हा एकदा मळून त्याचे मोठया पुरीसाठी करतो एवढे साधारण वीस-पंचवीस गोळे करून लाटून घ्यावे
 5. प्रत्येक पुरीचे दोन भाग करावेत .  अर्ध्या भागाचा कोन करून सारण भरून तोंड बंद करावं .  (पाणी लावून चिकटवावं) . 
 6. नंतर मध्यम आचेवर समोसे तेलात बदामी रंगावर तळावेत
 7. रात्री समोसे तयार करून फिरॣज मध्ये ठेवून सकाळी तळून टिफिन साठी पटकन होणारी रेसिपी

Reviews for Samosas Recipe in Marathi (0)