मुख्यपृष्ठ / पाककृती / पत्ताकोबीचा झुणका

Photo of Pattakobicha zunaka by Smita Koshti at BetterButter
441
2
0.0(0)
0

पत्ताकोबीचा झुणका

Jul-27-2018
Smita Koshti
5 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पत्ताकोबीचा झुणका कृती बद्दल

डब्यात शक्यतो भाजी पोळीच देण्यावर माझा भर असतो. कारण ते पौष्टिक व पोटभरीचं असते.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 वाट्या बारीक चिरलेली पत्ताकोबी
  2. 1 चमचा आलं लसूण पेस्ट
  3. 1 चमचा हिरवी मिरची पेस्ट
  4. चिमूटभर गरम मसाला
  5. चवीनुसार मीठ
  6. बेसन पीठ 1 वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  7. कोथिंबीर बारीक चिरून थोडी
  8. फोडणीसाठी मोहरी, जीरे, हिंग, तेल

सूचना

  1. प्रथम कढईत तेल ( थोडे जास्त घेण साधारणपणे 4 चमचे ) गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, आलं लसूण पेस्ट, हिरवी मिरची पेस्ट टाकून चांगले परतून घ्या.
  2. लगेच त्यात चिरलेला पत्ताकोबी ,मसाला, मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ आणावी.
  3. मग त्यात बेसन पीठ थोडे थोडे घालत जायचे व हलवत रहावे जेणेकरून एकजीव होईल.
  4. जास्त पीठ घालू नये बसेल तितकेच घालावे.नाहीतर झुणका कोरडा होतो. व झाकण ठेवून वाफ आणावी. अधून मधून हलवत रहावे.
  5. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. किंवा थंड झाल्यावर डब्यात द्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर