मटार पराठा | Green Peice Recipe in Marathi

प्रेषक Bharti Kharote  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Green Peice recipe in Marathi,मटार पराठा, Bharti Kharote
मटार पराठाby Bharti Kharote
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

मटार पराठा recipe

मटार पराठा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Green Peice Recipe in Marathi )

 • हिरवे मटार दोन वाट्या
 • अर्धी वाटी खोबरयाचा खीस
 • 4/5 लसूण पाकळ्या
 • एक ईंच आल्याचा तुकडा
 • 5/6 हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार मीठ
 • फोडणी साठी तेल जीरे
 • कणिक साठी
 • दोन वाट्या गव्हाचे पीठ
 • एक मोठा चमचा तेल
 • चवीनुसार मीठ
 • आवश्यकतेनुसार पाणि

मटार पराठा | How to make Green Peice Recipe in Marathi

 1. एका वाडग्यात गव्हाचे पीठ घेऊन त्यात मीठ आणी तेल घाला. .
 2. थोडे थोडे पाणी घालून पोळीची कणिक भिजवतो तसे पीठ भिजवा..
 3. 15 मी.झाकण ठेवून बाजूला ठेवा. .
 4. तोपर्यंत स्टफींग साठी मटार आल लसूण हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या. .
 5. चांगल बारीक वाटण करून घ्या. .
 6. आता पॅन मध्ये तेल टाकून जीरे ची फोडणी दया. .त्या वर खोबरे खीस घालून मीठ घाला...
 7. 5 मी..शिजवून घ्या. .आणि एका बाऊल मध्ये काढा. ..
 8. आता कणिक ची लाटी लाटून घ्या त्यात हे सारण भरा. .
 9. ईमेज मध्ये दाखवलय तस पॅक करा. .
 10. आता त्याचा ऊंडा बनवून पीठ लावून घ्या. .
 11. आणि अलगद हाताने पराठा लाटून घ्या. .
 12. गॅस वर तवा ठेवा त्या वर तेल टाकून पराठा घाला. .
 13. दोन्ही बाजूंनी तेल टाकून चांगले भाजून घ्या. .
 14. असेच सर्व पराठे बनवून घ्या. .आणि चटणी सोबत टीफीन ला दया. .

My Tip:

फ्रोजन मटार नसतील तर गरम पाण्यात वाफवून घ्यावे. ..

Reviews for Green Peice Recipe in Marathi (0)