व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता | Veg biryani with onion rayta Recipe in Marathi

प्रेषक priya Asawa  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Veg biryani with onion rayta recipe in Marathi,व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता, priya Asawa
व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायताby priya Asawa
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता recipe

व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Veg biryani with onion rayta Recipe in Marathi )

 • बासमती तांदुळ 2 कप
 • तेल 1/2 कप
 • चांगला तुप 1/2 कप
 • बटाटे 2 लांब व पातळ कापलेले
 • कांदे 2 ते 3 लांब व पातळ कापलेले
 • काजु 10-12
 • किसमीस 10-12
 • वेलची 3, लवंग 3, तमालपत्र 2, काळीमीरी 5-6 दाणे, शहाजीरा 1 चमचा, लाल तिखट पाव चमचा, हळद 1/2 चमचा, धने - जीरे पावडर 2 चमचे, गरम मसाला , वेलची पूड 1/2 चमचा, मीठ व साखर चवीनुसार
 • दही 1/2 कप
 • दुधाची साय पाव कप
 • मध्यम आकारात कापलेली मिक्स भाज्या गाजर, फुलवर, शिमला, हिरवे वटाने
 • मिक्सर मधुन काढण्याचे सामान
 • कांदे 2
 • टोमॅटो 1
 • लसणाची 5-6 कळ्या
 • किसलेला आल् 1 चमचा
 • हिरवी मिरची 2-3
 • कोथिंबीर 2 चमचे
 • पुदिनयाचे 10 - 15 पान
 • बडीशेप 1 चमचा
 • काजु 8-10
 • कांद्याचा रायता
 • घट्ट दही 2 कप
 • चिरलेला बारीक कांदा 1/2 कप
 • लाल तिखट 1/2 चमचा
 • जीरा पावडर 1/2 चमचा
 • चाट मसाला 1/2 चमचा
 • मीठ व साखर चवीनुसार

व्हेज बिर्याणी व कांद्याचा रायता | How to make Veg biryani with onion rayta Recipe in Marathi

 1. मिक्सर मधुन काढण्याचे सामान सगळे एकजीव काढून घ्या
 2. भात एकदम मोकळा बनवून घ्या
 3. तेल गरम करून बटाटे लालसर तळून घ्या मग त्याच्यात कांदा हि लालसर व कुरकुरीत तळून घ्या आणि काजू व किसमीस थोडे तळून काढुन घ्या
 4. तुप गरम करून आख्या मसाला ची फोडणी द्या मग मिक्सर मधुन काढलेले टाकून तुप सुटेपर्यंत भाजुन घ्या व त्यात लाल तिखट, हळद, धने जीरे पावडर, गरम मसाला, वेलची पूड, मीठ, साखर, दही, दुधाची साय टाकून थोडे भाजुन घ्या
 5. बनवलेल्या भातात तळलेले बटाटे, कांदे, काजु व किसमीस टाकून मिक्स करून व भाताची तीन भाग करून घ्या
 6. एका चपट्या गोल डब्यात तुप लावुन त्याचा भाताचा एक भाग टाकुन पसरुन घ्या त्याचावर तयार केलेली भाजी आर्धी टाकून पसरुन घ्या परत त्या भाजीवर भाताचा दुसरा भाग टाकुन पसरुन घ्या व राहिलेली आर्धी भाजी टाकून पसरुन घ्या शेवटी राहिलेला भाताचा तिसरा भाग पसरुन घ्या डब्याचा झाकणाला सिल्व्हर फाॅइल पेपर लावून घ्या व झाकण लावून घ्या
 7. तवा गरम करून 10 मिनीट कमी आचेवर वाफवून घ्या
 8. व्हेज बिर्याणी तयार
 9. कांद्याचा रायता
 10. एक बाउल मध्ये दही, कांदा, लाल तिखट, जीरे पावडर, चाट मसाला, मीठ व साखर टाकून मिक्स करून घ्या
 11. कांद्याचा रायता तयार

My Tip:

काजु तळतानी लक्ष देऊन तळावेत कारण ते लगेच लाल होतात व भात ही खुला व पसरुन थंड करून घ्यावा

Reviews for Veg biryani with onion rayta Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo