कारल्याची भाजी | Karlyachi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  27th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Karlyachi bhaji recipe in Marathi,कारल्याची भाजी, Smita Koshti
कारल्याची भाजीby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

कारल्याची भाजी recipe

कारल्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Karlyachi bhaji Recipe in Marathi )

 • 4 छोटे कारले
 • 2 कांदे
 • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
 • गरम मसाला चिमुटभर
 • थोडीशी हळद
 • तिखट चवीनुसार
 • मीठ चवीनुसार
 • 1 चमचा धणे पूड
 • 3 चमचे भाजलेले शेंगदाणे कूट
 • फोडणी साठी तेल, जीर, मोहरी, हिंग
 • कोथिंबीर बारीक चिरून

कारल्याची भाजी | How to make Karlyachi bhaji Recipe in Marathi

 1. कारल्याच्या पातळ छोट्या चकत्या करून त्या मीठ चोळून 5..10..मिनीटे ठेवावे.
 2. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घाला व चांगला परतून घ्या.
 3. आता त्यात धने पूड, हळद ,तिखट घालून चांगले परतून घ्या.
 4. कारल्याच्या पातळ चकत्या ज्या मीठ लावून मुरवत ठेवल्या होत्या त्या 2..3 पाण्याने धुऊन घ्या व घट्ट पिळून घ्या व फोडणीत घाला.
 5. चांगले परतून झाकून वाफ काढून शिजवून घ्या. मधे मधे हलवत रहावे.
 6. शिजत आल्यावर त्यात शेंगदाणे कूट गरम मसाला घालून चांगले परतून घ्या व झाकण ठेवून एक वाफ काढा.
 7. कोथिंबीर घालून डब्यात भरा.

My Tip:

कारले मीठ चोळून मुरवत जरूर ठेवावे अश्याने कारल्याचा कडवटपणा नाहीच्या बरोबर राहतो.

Reviews for Karlyachi bhaji Recipe in Marathi (0)