मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी चणा डाळ भाजी

Photo of Bottleguard Chana dal sabji by Renu Chandratre at BetterButter
970
2
0.0(0)
0

दुधी चणा डाळ भाजी

Jul-27-2018
Renu Chandratre
15 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी चणा डाळ भाजी कृती बद्दल

दुधी आणि चणा डाळ घालून केलेली आंबट गोड भाजी , पोळी पराठा बरोबर छान लागते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • सिमरिंग
  • साईड डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 2

  1. बारीक चिरलेला दुधी / लौकि २ वाटी
  2. बारीक चिरलेला टोमॅटो १ वाटी
  3. चणा डाळ १/२ वाटी
  4. तेल १-२ मोठे चमचे
  5. मोहरी १/२ चमचा
  6. जीरे १ चमचा
  7. हिंग १/४ चमचा
  8. ठेचलेले लसुण १ चमचा
  9. हळद तिखट मीठ चवीनुसार
  10. धणे पूड १ चमचा
  11. गूळ २-३ चमचे
  12. कोथिंबीर सजवती साठी

सूचना

  1. सर्वप्रथम दुधी भोपळा धुवून , सोलून बारीक चिरून घ्या
  2. चणा डाळ धुवून ५-१० मिनिटे पाण्यात भिजवून ठेवावे
  3. तेल गरम करून त्यात मोहरी जीरे ची फोडणी करावी
  4. हिंग आणि ठेचलेले लसूण घाला
  5. हळद तिखट घाला , आणि लगेच चिरलेला दुधी घाला
  6. भिजवून ठेवलेल्या चणा डाळी च सगळं पाणी काढून टाका
  7. डाळ पण भाजीत टाका
  8. चवीनुसार मीठ आणि धणे पूड घालून मिक्स करावे
  9. झाकून ,५-१० मिनिटे शिजवावे
  10. अधून मधून परतावे
  11. दुधी भोपळा मऊ झाला की , बारीक चिरलेला टोमॅटो आणि गूळ घालून मिक्स करावे
  12. न झाकता , टोमॅटो शिजे पर्यंत , भाजी थोडया वेळ अजून शिजू द्यावे
  13. कोथिंबीर घालून , पोळी पराठा सोबत टिफिन मध्ये पॅक करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर