वडा पाव | Vadapav Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vadapav recipe in Marathi,वडा पाव, Teju Auti
वडा पावby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

वडा पाव recipe

वडा पाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vadapav Recipe in Marathi )

 • ४ मध्यम बटाटे
 • ४ ते ५ हिरव्या मिरच्या
 • वडे तळण्यासाठी तेल
 • ४-५ लसणींची पेस्ट
 • १ इंच आले पेस्ट
 • ३-४ कढीपत्ता पाने
 • कोथिंबीर
 • २ टिस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/४ टिस्पून हळद चवीपुरते मीठ
 • १ कप चणा पिठ, ३/४ ते १ कप पाणी, १/२ टिस्पून हळद, चवीपुरते मीठ, चिमूटभर खायचा सोडा

वडा पाव | How to make Vadapav Recipe in Marathi

 1. शिजवलेले बटाटे व्यवस्थित कुस्करून घ्यावे. कढईत २ चमचे तेल गरम करावे. मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढीपत्ता, मिरच्या आणि नंतर आले-लसूण पेस्ट घालावी. त्यात कुस्करलेला बटाटा घालून परतावे. चवीपुरते मीठ घालावे. मीठ आणि फोडणीचे तेल बटाट्याला व्यवस्थित लागेल असे कालथ्याने मिक्स करावे. तयार भाजीचे २ इंच इतपत गोळे करावे.
 2. भाजी तयार झाली कि आवरणासाठी चणा पिठ पाण्यात भिजवावे. अर्धा चमचा हळद, सोडा आणि चवीपुरते मिठ घालावे. पिठ अगदी पातळ किंवा अगदी घट्ट भिजवू नये.
 3. कढईत तेल गरम करावे. तळताना वडा तेलात पुर्ण बुडेल इतपत तेल कढईत घालावे. तेल व्यवस्थित तापू द्यावे. भिजवलेल्या पिठाचा एक थेंब तेलात टाकावा. जर तो टाकल्या टाकल्या वर आला तर तेल तापले आहे असे समजावे. तेल तापले कि गॅस मिडीयम हायवर ठेवावा.
 4. ४) भिजवलेल्या पिठात तयार भाजीचा एक गोळा बुडवून तेलात सोडावा. असे तिन चार वडे (किंवा तळताना कढईत सुटसुटीत मावतील एवढे) गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळावेत.

Reviews for Vadapav Recipe in Marathi (0)