पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा | Chapati with Amla Murrabba Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Chapati with Amla Murrabba recipe in Marathi,पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा, Shraddha Juwatkar
पोळ्या आणि आवळयाचा मुरांबाby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  40

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

About Chapati with Amla Murrabba Recipe in Marathi

पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा recipe

पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Chapati with Amla Murrabba Recipe in Marathi )

 • 500 ग्राम मोठे आवळे
 • 500 ग्राम साखर
 • 1/2 टीस्पून दालचिनी पावडर
 • चिमूटभर काळीमिरी पावडर
 • 1 चमचा वेलचीची पूड
 • पोळी साठी कणीक, मीठ, पाणी व तेल

पोळ्या आणि आवळयाचा मुरांबा | How to make Chapati with Amla Murrabba Recipe in Marathi

 1. प्रथम आवळे स्वछ धूवून कपड्याने पुसून किसून घ्यावे
 2. आता एका कढईत आवळयाचा किस व साखर घालून साखर विळघळेपर्यंत ढवळत राहावे
 3. साखर विरघळली की गॅस कमी करुन त्यात दालचिनी, काळीमिरी व वेलचीची पूड घालून चांगले ढवळून घ्यावे
 4. पाच मिनिटं झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यावे
 5. नंतर झाकण काढून मुरांबा परतून घ्यावा ओलसर असतानाच गॅस बंद करावा.
 6. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावा.
 7. कणीक मळून नेहमीप्रमाणे पोळ्या कराव्यात

My Tip:

साखरेच्या ऐवजी गूळही वापरू शकता. हा मुरांबा बाहेर ठेवला तरीही छान टिकतो

Reviews for Chapati with Amla Murrabba Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo