भरले वांगे | Stuffed bringle Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuffed bringle recipe in Marathi,भरले वांगे, Smita Koshti
भरले वांगेby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

भरले वांगे recipe

भरले वांगे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuffed bringle Recipe in Marathi )

 • 1/4 किलो छोटे वांगे
 • 1/2 वाटी भाजलेले शेंगदाणे कूट
 • 2 चमचे लाल तिखट
 • 1 चमचा धणे पूड
 • 1 चमचा शोप पूड
 • 1 चमचा जीरे पूड
 • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
 • मुठभर कोथिंबीर बारीक चिरून
 • मीठ चवीनुसार
 • 1/2 चमचा हळद
 • 1/2 चमचा गरम मसाला
 • 4-5 पाने कढीपत्ता
 • फोडणीसाठी मोहरी, जीर, हिंग चिमूटभर,
 • 2 लवंग
 • 1/2 इंच तुकडा दालचीनी
 • 2 तमालपत्र
 • तेल

भरले वांगे | How to make Stuffed bringle Recipe in Marathi

 1. वांगे स्वछ धुऊन कोरडे पुसून घ्या. वांग्याला मधे दोन चीरा देऊन चार भाग करणे. फक्त देठापर्यंतच चीर द्यावी. जेणेकरून देठापासून फोडी जोडलेल्या राहतील. ( नेहमी प्रमाणे भरल्या वांग्यासाठी कापतो तसे)
 2. तेल गरम करून त्यात कापलेले वांगे चांगले तळून घ्या .
 3. आता मसाला करू.. शेंगदाणे कूट, धणे पूड, शोप पूड, जीरे पूड, थोडे मीठ, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, आलं लसूण पेस्ट, सर्व घालून चांगले एकजीव करावे. हा झाला मसाला तयार.
 4. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, लवंग, दालचिनी, तुकडा तमालपत्र ,कढीपत्ता पाने घालून चांगले परतून घ्या.
 5. वांग्याच्या काप मधे तयार मसाला भरायचा. व अलगद फोडणीत ठेवून व वरून उरलेला मसाला घालून एक वाफ काढा
 6. नंतर दोन मिनिटे चांगले परतून घ्या . कोथिंबीर घालून सर्व्ह करा किंवा डब्यात भरा.
 7. दुसरा प्रकार कुकर मध्ये करायचा तो असा की.. वांग्याला मधे काप देणे व कच्च्या वांग्याच्या काप मधे तयार मसाला भरायचा व फोडणीत ठेवून वर उरलेला मसाला घालून 1/2 कप पाणी घालून 1 शिट्टी काढून घ्या. व वाफ जीरली की कोथिंबीर घालून सर्व्ह करा. ही भाजी आपण हवे तसे पाणी घालून रस्सा करू शकतो.

My Tip:

कापलेले वांगे काही वेळाने काळे पडतात. म्हणून ती कापून मीठाच्या पाण्यात बुडवून ठेवावी. किंवा मीठ चोळून ठेवावे.

Reviews for Stuffed bringle Recipe in Marathi (0)