ओट्स इडली | Oats idali Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Oats idali recipe in Marathi,ओट्स इडली, Pranali Deshmukh
ओट्स इडलीby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  25

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

ओट्स इडली recipe

ओट्स इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Oats idali Recipe in Marathi )

 • 1 वाटी प्लेन ओट्स
 • 1/2 वाटी रवा
 • 1/4 कप दही
 • 1/4 कप मटार
 • 1/4 कप गाजर किसून
 • 2 चमचे उडीद डाळ
 • 2 चमचे चणा डाळ
 • 1 कांदा बारीक चिरून
 • कढीपत्ता 3-4
 • मोहरी 1 tbsp
 • मीठ
 • तेल 1 छोटा tbsp
 • फ्रुट इनो 1 चमचा
 • पाणी 1 कप

ओट्स इडली | How to make Oats idali Recipe in Marathi

 1. ओट्स म्हणजे जव . आणखी वेगळं काही नाही .यामध्ये फायबर आणि प्रोटीन च प्रमाण जास्त असतं शिवाय एक वाटी ओटमील घेतल्यावर लगेच भूक लागत नाही .हळुहळु पचन होतं त्यामुळे आपोआप वजन कमी करायला मदत होते.
 2. ओट्स हलके भाजून घ्यायचे सुगंध आल्यावर गॅस बंद करायचा आणि थंड करायचे.
 3. थंड झाले कि मिक्सरला फिरवून घ्यायचे .खूपबारीक करायचे नाही कारण इडली रवाळ छान लागते जर जास्त बारीक ग्राइंड केले तर इडली चिकट होते.
 4. पॅनमध्ये तेल टाका तेल तापल्यावर मोहरी ,कढीपत्ता ,उडीद डाळ ,चणा डाळ भाजून घ्या.
 5. आता कांदा घाला आणि थोडावेळ परतवा.
 6. कांदा झाला कि रवा घाला आणि पाच मिनिट छान भाजून घ्या.
 7. रवा एका बाऊलमध्ये काढा ,त्यामध्ये बारीक केलेली ओट्स ,मटार ,गाजर ,मीठ घाला आणि दही घालून मिक्स करा.
 8. दही मिक्स केल्यावर थोडं पाणी घालून इडली च्या बॅटर प्रमाणे पातळ झाले पाहिजे .खूपघट्ट नको आणि खूप पातळही नको .इडली च्या मोल्ड मध्ये टाकतांना चमच्याने ड्रॉप पडला कि समजायचं बॅटर जमलं.
 9. इडली पात्रात पाणी घालून उकळायला ठेवा आणि इडली मोल्डला ग्रीसिंग करा.
 10. उकळी आली कि फ्रुट इनो थोड्या पाण्यात मिक्स करून ऍड करा आणि एकाच दिशेने मिक्स करा .
 11. इनो घातल्यावर लगेच बॅटर वर आल्यासारखे वाटेल.
 12. मोल्डमध्ये बॅटर सेट करा आणि पात्रात ठेवून .झाकण लावून 15 मिनिट होवू द्या .
 13. पंधरा मिनिटांनी गॅस बंद करा आणि 10-15 मिनिट थंड होऊ द्या .नंतर सूरी च्या साहाय्याने इडली काढून घ्या .
 14. काढतांना घाईघाईत काढली तर मोल्डला बरेचदा इडली चिकटते म्हणून थंड झाल्यावर काढायची .
 15. चार पाच खोबऱ्याचे तुकडे ,पुदिना ,दोन हिरव्या मिरच्या ,लिंबाचा रस ,साखर ,मीठ घालून मिक्सर मध्ये चटणी वाटून घ्या .चटणीबरोबर टिफिनमध्ये द्या.
 16. रोज ओट्स मिल एकवेळ जरी घेतले तरी तुम्ही फिट रहाल आणि चवीचं म्हणाल तर ! पौष्टिक पदार्थ हा दिसायला आकर्षक नसतो आणि चवही नसते असा आपला दृष्टिकोन बनला आहे .
 17. पण ओट्समुळे इडलीला खूप छान चव येते अशी रंगबिरंगी इडली मुलेही आवडीने खातील .बरेचदा मुलं भाजी पोळी खायला टाळतात तुम्हाला टिफिनमध्येही देता येईल .

My Tip:

ओट्स स्टोर करतांना हवाबंद ,अंधाऱ्या डब्यात ठेवावे .तुम्ही वर्षभरासठी ओट्स स्टोर करू शकता.

Reviews for Oats idali Recipe in Marathi (0)