पनीर थालीपीठ | Paneer thalipeeth Recipe in Marathi

प्रेषक Manisha Sanjay  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Paneer thalipeeth recipe in Marathi,पनीर थालीपीठ, Manisha Sanjay
पनीर थालीपीठby Manisha Sanjay
 • तयारी साठी वेळ

  30

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

2

0

पनीर थालीपीठ recipe

पनीर थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Paneer thalipeeth Recipe in Marathi )

 • तांदूळ पीठ - २ वाटी
 • गव्हाचे पीठ - १ वाटी
 • बेसन पीठ - १/४ वाटी
 • पनीर - १ वाटी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर - १ वाटी
 • बारीक चिरलेला कांदा - १ वाटी
 • मीठ चवीनुसार
 • हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार
 • तिळ - १ टेबलस्पून
 • हळद -१ टीस्पून
 • तेल लागेल असे

पनीर थालीपीठ | How to make Paneer thalipeeth Recipe in Marathi

 1. सगळे साहित्य एकत्र करून घ्या.
 2. पाणी घालून भाकरी च्या पिठा सारखे पिठ भिजवून घ्या.
 3. १०-१५ मिनिटे पीठ झाकून ठेवा.
 4. थालीपीठ थापून, गरम तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्या.

Reviews for Paneer thalipeeth Recipe in Marathi (0)