बासुंदी | Basundi Recipe in Marathi

प्रेषक Aarya Paradkar  |  28th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Basundi recipe in Marathi,बासुंदी, Aarya Paradkar
बासुंदीby Aarya Paradkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  3

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

बासुंदी recipe

बासुंदी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Basundi Recipe in Marathi )

 • 2 लिटर दूध
 • पाऊण वाटी साखर
 • 1/2 वाटी मिल्क पावडर
 • 1 चमचा़ वेलची पावडर

बासुंदी | How to make Basundi Recipe in Marathi

 1. एका भांड्यात दूध मंद आचेवर आटवण्यास ठेवणे
 2. थोड्या दूधात मिल्क पावडर विरघळून ठेवा, गुठळी होऊ देवू नये
 3. भांड्यावर आडवा डाव /चमचा ठेवणे, म्हणजे दूध करपत नाही व उतू पण जात नाही
 4. दूध करपू देऊ नये म्हणून अधून मधून हालवत राहणे, दूध करपल्यास चव बिघडते
 5. दूध आर्धे आटल्यावर त्यात साखर व मिल्क पावडर हलवून मिक्स करून पुन्हा दाट होई पर्यंत आटवत ठेवणे,नंतर वेलची पावडर घालणे
 6. फ्रिज मधे थंड करून सर्व्ह करणे

My Tip:

दुध आटवत ठेवताना त्यावर आडवा चमचा ठेवल्यास दूध उतू जात नाही व ते करपत ही नाही 2 दिवस छान राहते

Reviews for Basundi Recipe in Marathi (0)