पुरणाचे स्प्रिंग रोल्स | Sweet Spring Rolls Recipe in Marathi

प्रेषक जयश्री भवाळकर  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Spring Rolls recipe in Marathi,पुरणाचे स्प्रिंग रोल्स, जयश्री भवाळकर
पुरणाचे स्प्रिंग रोल्सby जयश्री भवाळकर
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

8

0

पुरणाचे स्प्रिंग रोल्स recipe

पुरणाचे स्प्रिंग रोल्स बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Spring Rolls Recipe in Marathi )

 • 1 कप चण्याची डाळ
 • 1 1/2 /चवीनुसार कप साखर
 • 1 चमचा वेलची पावडर
 • 1 कप मैदा
 • 1 मोठा चमचा तेल मोहन साठी
 • 1 चिमूट मीठ
 • 1 मोठा चमचा मैदा स्लरी साठी
 • 1 - मोठा चमचा काजू बदाम
 • 1 चमचा मध
 • तूप टाळण्यासाठी

पुरणाचे स्प्रिंग रोल्स | How to make Sweet Spring Rolls Recipe in Marathi

 1. चण्याची डाळ 1 1/2 कप पाणी घालून 3 शिट्टी देऊन अगदी मऊ शिजवून घ्या.
 2. डाळ थंड झाल्यावर पूरण यंत्रातून काढून पेस्ट करा.
 3. आता एका कढईत वाटलेली डाळ आणि साखर एकत्र करा .
 4. मंद आचेवर शिजवा.
 5. हे तो पर्यंत आटवायचे कि ज्या उचटण्यानी हालवतो आहे तो पुराणात अगदी सरळ उभा झाला म्हणजे पुरण झालं .
 6. थंड झाल्या वर पुरणाचे छोटे लांबट रोल बनवून घ्या.
 7. आता मैद्यात तेलाचं मोहन एक चिमूट मिठ घालून कणिक मळून घ्या.
 8. हि कणिक 10 मिनिट झाकून ठेवा.
 9. आता मैदा ची छोटी लाटी घेऊन पातळ पोळी लाटून घ्या .
 10. पोळी च्या मध्ये पुरणाची लांबट रोल ठेवा आणि अळूच्या वड्या सारख बंद करा थोडं मैदा चा घोळ लावून शेवटी  चिपकवून घ्या.
 11. आता कढईत तूप तापवा
 12. हे पुरणाचे स्प्रिंग रोल बदामी रंगा वर खरपूस तळून घ्या.
 13. एका छान प्लेट मध्ये कापून वरून मध घालून काजू किशमिश ची सजावट करून सर्व्ह करा.

My Tip:

हेल्दी बनवायला मैदा ऐवजी गव्हाचं पिठ घेऊ शकता.

Reviews for Sweet Spring Rolls Recipe in Marathi (0)