मुख्यपृष्ठ / पाककृती / कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने)

Photo of Coriander vadi by Manasvi Pawar at BetterButter
522
1
0.0(0)
0

कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने)

Jul-29-2018
Manasvi Pawar
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोथिंबीर वडी(वेगळ्या पद्धतीने) कृती बद्दल

कोथिंबीर ची वडी आपण सगळेच करतो पण या रेसिपी ला थोडा ट्वीस्ट दिला आहे.ही रेसिपी पटकन पण होते

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. दीड वाटी ज्वारीचे पीठ
  2. एक वाटी बेसन
  3. दोन चमचे तांदळाचे पीठ
  4. एक छोटी जुडी कोथिंबीर
  5. एक चमचा हळद
  6. एक चमचा तेल उकडीसाठी
  7. हिंग १/२ चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. आल लसूण मिरची जिरे पेस्ट चार चमचे
  10. तेल तळण्यासाठी
  11. अडीच कप पाणी

सूचना

  1. कोथिंबीर निवडून धुवून बारीक चिरून घ्या नेहमी प्रमाणे
  2. आता एका पातेल्यात अडीच कप पाणी घालून उकळी येऊ द्यावी
  3. त्यामध्ये हिंग हळद आलं लसूण जिरे मिरची पेस्ट आणि मीठ घालून पुन्हा थोडी उकळी येऊ द्या थोडं तेल घाला
  4. आता यामध्ये आपण घेतलेली पीठे हळूहळू पाण्यात घालावीत
  5. फायनली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करावे
  6. पाच दहा मिनिटे झाकण ठेवून वाफ काढावी
  7. आता एका ताटाला तेल लावून त्यावर हे मिश्रण घालावे आणि थापावे
  8. वड्या पाडाव्यात
  9. हवा तो आकार द्यावा
  10. शॅलो फ्राय करावे किंवा असंही छान लागतात

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर