ओल्या काजूची भाजी | Olya kajuchi bhaji Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Olya kajuchi bhaji recipe in Marathi,ओल्या काजूची भाजी, Smita Koshti
ओल्या काजूची भाजीby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

About Olya kajuchi bhaji Recipe in Marathi

ओल्या काजूची भाजी recipe

ओल्या काजूची भाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Olya kajuchi bhaji Recipe in Marathi )

 • 1 वाटी काजूगर ( स्वच्छ केलेली)
 • 8..10..काजू ( भिजवून पेस्ट करून)
 • 1 मोठा कांदा बारीक चिरून
 • 1 मध्यम टोमॅटो बारीक चिरून
 • 1 चमचा गोडा मसाला
 • 1 चमचा चमचा जिरे पूड
 • 1 चमचा धणे पूड
 • लाल तिखट आवडीनुसार
 • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
 • मीठ चवीनुसार
 • कोथिंबीर बारीक चिरून थोडी

ओल्या काजूची भाजी | How to make Olya kajuchi bhaji Recipe in Marathi

 1. कांदा थोड्या तेलावर सोनेरी रंगावर परतून घ्या. व पेस्ट करा.
 2. कढईत तेल घालून त्यात कांदा पेस्ट चांगली तेल सुटेपर्यंत परता .
 3. लाल तिखट, धने जीरे पूड, हळद आलं लसूण पेस्ट मसाला घालून चांगले परतून घ्या.
 4. मग , त्यात टोमॅटो वाटून ती प्युरी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
 5. तसेच काजू पेस्ट घालून चांगले परतून घ्या..तेल सुटेपर्यंत.
 6. आता त्यात ओले काजू टाका व झाकण लावून वाफ काढा. थोडे पाणी घालुन.
 7. छान मिळून आली की कोथिंबीर घालून डब्यात भरा
 8. डब्यात सोबत जीरा राईस ही द्यावा, अफलातून चव येते.

My Tip:

ओले काजू नसतील तर भिजलेले काजू वापरू शकतो.

Reviews for Olya kajuchi bhaji Recipe in Marathi (0)