झटपट पोहा रवा इडली | Instant Poha Rava Idli Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Instant Poha Rava Idli recipe in Marathi,झटपट पोहा रवा इडली, Shraddha Juwatkar
झटपट पोहा रवा इडलीby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  45

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

झटपट पोहा रवा इडली recipe

झटपट पोहा रवा इडली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Instant Poha Rava Idli Recipe in Marathi )

 • 1 कप जाड पोहे
 • 1 कप रवा
 • 1 कप घट्ट दही
 • चवीनुसार मीठ
 • 1/2 चमचा इनो साल्ट
 • पाणी आवश्यकतेनुसार
 • तेल

झटपट पोहा रवा इडली | How to make Instant Poha Rava Idli Recipe in Marathi

 1. पोहे मिक्सरमध्ये रव्या सारखी पावडर करून घेणे
 2. एका पातेल्यात पोहा पावडर रवा दही व मीठ घालून चांगले एकजीव करुन घ्यावे.आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण 20 मिनिटे झाकून ठेवावे.जास्त पातळ करू नये
 3. इडलीच्या कुकर मध्ये पाणी उकळायला ठेवावे. व इडली पात्राना थोडे तेल लावून ठेवावे
 4. आता मिश्रणात इनो घालून त्यावर 1 चमचा पाणी घालावे व मिक्स करून घेणे.
 5. इडली पात्रात मिश्रण घालून 20 मिनिटे इडली उकडून घ्यावी.
 6. 10 मिनिटांनी कुकरचे झाकण काढून चाकूने इडली काढून चटणी सोबत टिफिन मध्ये पॅक करावी.

Reviews for Instant Poha Rava Idli Recipe in Marathi (0)