मुख्यपृष्ठ / पाककृती / ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन

Photo of Brown Rice Oats Manchurian by Jayshree Bhawalkar at BetterButter
279
2
0.0(0)
0

ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन

Jul-29-2018
Jayshree Bhawalkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ब्राऊन राईस ओट्स मंचुरीयन कृती बद्दल

मंचुरीयन ही चायनीझ रेसिपी आहे .मी हिच्यात भारतीयता आणि पौष्टिकता आणत फ्यूजन केले आहे.हे मंचुरीयन ब्राऊन राईस नी बनवले.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • टिफिन रेसिपीज
  • फ्युजन
  • स्टर फ्रायिंग
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 वाटी शिजलेला ब्राऊन राईस चा भात
  2. 1/4 ओट्स मिक्सर मधून रवाळ दळून घेतलेले
  3. 1/2 वाटी बारीक चिरलेली पान गोभी/पत्ता गोभी
  4. 1/4 कप बारीक चिरलेला गाजर
  5. 1/4 कप बारीक चिरलेली सिमला मिरची
  6. 1/4 कप बारीक चिरलेला हिरवा पाती चा कांदा
  7. 3 मोठे चमचे बारीक चिरलेला लसूण
  8. 1/2 मोठा चमचा बारीक चिरलेला अदरक
  9. 2 मोठे चमचे काळी मिरी पावडर
  10. 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोर/मैदा
  11. चवीनुसार / 1 1/2 चमचा मिठ
  12. 2 मोठे चमचे टोमेटो सॉस
  13. 2 मोठे चमचे सोया सॉस
  14. 2 मोठे चमचे लाल मिरची सॉस
  15. 1 मोठा चमचा व्हिनेगर
  16. मंचुरीयन तळायला तेल

सूचना

  1. एका वाडग्यात ब्राऊन राईस चा भात आणि ओट्स ,कोबी,गाजर,सिमला मिरची,पाती चा कांदा, लसूण,अदरक,मिरी पावडर,आणि कॉर्नफ्लोर मीठ घालून नीट मळून घ्या आणि छोटे छोटे गोळे बनवून घ्या .
  2. एका कढईत तेल तापवून मंचुरीयन चे गोळे तळून घ्या.
  3. ह्या कढईतले सगळं तेल काढून फक्त 2 चमचे तेल राहु द्या.
  4. ह्या तेलात एक एक करून सगळे सॉस,2 चमचे पाणी आणि 1 चमचा कॉर्नफ्लोर घालून शिजवून सॉस सारख घट्ट करून घ्या .
  5. ह्यात सगळे तळलेले मंचुरीयन घालून नीट मिक्स करा.
  6. डिश मधे थोडं सॅलड बरोबर मंचुरीयन पाती च्या कांद्या ,गाजर नी सजवून गरमा गरम सर्व्ह करा .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर