खान्देशी वांग्याचे भरीत | Khandeshi vangyache bharit Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khandeshi vangyache bharit recipe in Marathi,खान्देशी वांग्याचे भरीत, Smita Koshti
खान्देशी वांग्याचे भरीतby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

About Khandeshi vangyache bharit Recipe in Marathi

खान्देशी वांग्याचे भरीत recipe

खान्देशी वांग्याचे भरीत बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khandeshi vangyache bharit Recipe in Marathi )

 • 1/2 किलो भरीताचे मोठे वांगे
 • आतपाव कांद्याची पात बारीक चिरून
 • 4..5 कमी तिखट हिरव्या जाड मिरच्या
 • 4 तिखट हिरव्या मिरच्या
 • 7..8. लसूण पाकळ्या
 • थोडी लसणाची पात ( अॉप्शनल)
 • 1 इंच आलं
 • 2 चमचे शेंगदाणे
 • 1 चमचा खोबऱ्याचे पातळ काप
 • 4..5 पाने कढीपत्ता
 • फोडणी साठी जीरे, मोहरी ,हिंग ,हळद
 • तेल..

खान्देशी वांग्याचे भरीत | How to make Khandeshi vangyache bharit Recipe in Marathi

 1. वांगे धुऊन पुसून त्यांना तेलाचा हात फिरवून चाकूने टोचे मारून घ्या. व गॅसच्या शेगडीवर जाळी ठेवून सगळी कडून छान भाजून घ्या. हे वांगे मोठे व भरीव असतात इतके की 1/2 किलो मधे 1 किंवा 2 च वांगे बसतात.
 2. तोपर्यंत कढईत दोन्ही प्रकारच्या मिरच्या थोडे तेल घालून चांगले भाजून घ्या.
 3. आता तिखट मिरच्या, आलं ,लसूण हे जाडसर वाटून घ्यावे. व कमी तिखट जाड मिरच्याना मधोमध एक चीर देऊन त्यात चवीपुरते मीठ लावून घ्या.
 4. भाजलेले वांगे सोलून, ठेचून घ्या. देठाचा भाग काढून टाका.
 5. कढईत तेल गरम करा.. तेल टाकताना हात आखडता घेऊ नये.. तेलाने भरीत लुसलुशीत होण्यासाठी मदत होते.
 6. त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता पाने शेंगदाणे घालून चांगले परतून घ्या व वाटलेला ठेचा व मीठ भरलेल्या मिरच्या घालून चांगले परतून घ्या.
 7. आता ह्या फोडणीत बारीक चिरलेली कांद्याची पात, लसणाची पात टाकून चांगले परतून घ्या.
 8. आता ठेचलेले वांगे ह्यात घालून मीठ टाकावे व तेल सुटेपर्यंत परतून घ्या. व झाकण ठेवून एक वाफ काढा.
 9. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. किंवा डब्यात भरा.
 10. भरीत तयार. कढी, कळण्याची भाकर किंवा पूरी व भरीत लुसलुशीत.. आहाहा... अफलातून... पाणी सुटले तोंडात...

My Tip:

डब्यात जास्त गरम पदार्थ भरू नये खराब होण्याची शक्यता असते .आपल्या कामाचा वेग, व्यवस्थापनावर लागणारा पदार्थांचा वेळ ठरतो

Reviews for Khandeshi vangyache bharit Recipe in Marathi (0)