मुख्यपृष्ठ / पाककृती / खान्देशी वांग्याचे भरीत

Photo of Khandeshi vangyache bharit by Smita Koshti at BetterButter
3576
2
0.0(0)
0

खान्देशी वांग्याचे भरीत

Jul-29-2018
Smita Koshti
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खान्देशी वांग्याचे भरीत कृती बद्दल

ही खान्देशातील एक प्रसिद्ध पाककृती आहे. भरीतासाठी खानदेशात विशिष्ट प्रकारचे वांगे वापरले जातात. हिवाळ्यात ते मिळतात. ह्या भरीताची चवही खूप सुंदर येते. सीझन मधे आमच्या कडे आठवड्यातील 3 दिवस भरीत असतेच असते. आणि डब्यात न्यायला तर मुलं हट्ट करतात. नक्की करून बघा खान्देशी वांग्याचं भरीत....

रेसपी टैग

  • व्हेज
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/2 किलो भरीताचे मोठे वांगे
  2. आतपाव कांद्याची पात बारीक चिरून
  3. 4..5 कमी तिखट हिरव्या जाड मिरच्या
  4. 4 तिखट हिरव्या मिरच्या
  5. 7..8. लसूण पाकळ्या
  6. थोडी लसणाची पात ( अॉप्शनल)
  7. 1 इंच आलं
  8. 2 चमचे शेंगदाणे
  9. 1 चमचा खोबऱ्याचे पातळ काप
  10. 4..5 पाने कढीपत्ता
  11. फोडणी साठी जीरे, मोहरी ,हिंग ,हळद
  12. तेल..

सूचना

  1. वांगे धुऊन पुसून त्यांना तेलाचा हात फिरवून चाकूने टोचे मारून घ्या. व गॅसच्या शेगडीवर जाळी ठेवून सगळी कडून छान भाजून घ्या. हे वांगे मोठे व भरीव असतात इतके की 1/2 किलो मधे 1 किंवा 2 च वांगे बसतात.
  2. तोपर्यंत कढईत दोन्ही प्रकारच्या मिरच्या थोडे तेल घालून चांगले भाजून घ्या.
  3. आता तिखट मिरच्या, आलं ,लसूण हे जाडसर वाटून घ्यावे. व कमी तिखट जाड मिरच्याना मधोमध एक चीर देऊन त्यात चवीपुरते मीठ लावून घ्या.
  4. भाजलेले वांगे सोलून, ठेचून घ्या. देठाचा भाग काढून टाका.
  5. कढईत तेल गरम करा.. तेल टाकताना हात आखडता घेऊ नये.. तेलाने भरीत लुसलुशीत होण्यासाठी मदत होते.
  6. त्यात मोहरी जिरे तडतडल्यावर त्यात हिंग, कढीपत्ता पाने शेंगदाणे घालून चांगले परतून घ्या व वाटलेला ठेचा व मीठ भरलेल्या मिरच्या घालून चांगले परतून घ्या.
  7. आता ह्या फोडणीत बारीक चिरलेली कांद्याची पात, लसणाची पात टाकून चांगले परतून घ्या.
  8. आता ठेचलेले वांगे ह्यात घालून मीठ टाकावे व तेल सुटेपर्यंत परतून घ्या. व झाकण ठेवून एक वाफ काढा.
  9. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. किंवा डब्यात भरा.
  10. भरीत तयार. कढी, कळण्याची भाकर किंवा पूरी व भरीत लुसलुशीत.. आहाहा... अफलातून... पाणी सुटले तोंडात...

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर