आलू चीज सँडविच | Alu cheese sandwhich Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Alu cheese sandwhich recipe in Marathi,आलू चीज सँडविच, Rohini Rathi
आलू चीज सँडविचby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

आलू चीज सँडविच recipe

आलू चीज सँडविच बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Alu cheese sandwhich Recipe in Marathi )

 • ब्रेडच्या स्लाईसेस दहा ते बारा
 • उकडलेले बटाटे चार ते पाच
 • बारीक चिरलेली हिरवी मिरची दोन टेबल स्पून
 • तेल एक टी स्पून
 • किसलेले चीज पाव कप
 • मीठ चवीनुसार
 • हळदी अर्धा टी स्पून
 • बटर दोन टेबल स्पून
 • हिरवी चटणी दोन टेबल स्पून
 • टोमॅटो केचप 3 ते 4 tbsp

आलू चीज सँडविच | How to make Alu cheese sandwhich Recipe in Marathi

 1. कुस्करलेल्या बटाट्यामध्ये हिरवी मिरची हळद मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे
 2. ब्रेडची एक स्लाईस घेऊन त्यावर एका बाजूने टोमॅटो केचप पसरवून घ्यावे
 3. नंतर पसरवलेल्या केचप वरती बटाट्याची केलेले मिश्रण भरून घ्यावे सर्व बाजूने दाबून भरून घ्यावे
 4. ब्रेडची दुसरी स्लाईस घेऊन त्यावर ती हिरवी चटणी पसरवून घ्यावी
 5. बटाट्याच्या मिश्रणाचा स्लाईसेस वर किसलेले चीज घालावे
 6. नंतर हिरव्या चटणी चे स्लाईस बटाट्याच्या स्लाईस वर ठेवून तव्यावर बटर घालून दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घ्यावे
 7. अशा प्रकारे तयार आलुची सँडविच चाकूच्या साह्याने त्रिकोणी कापून घ्यावे
 8. तयार आलुची सॅंडविच टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करावे

My Tip:

आवडत असल्यास काकडीची स्लाईस टोमॅटोची स्लाइस कांद्याची स्लाइस पण ब्रेडच्या स्लाईस वर ठेवू शकता

Reviews for Alu cheese sandwhich Recipe in Marathi (0)