छोटा बर्गर | Mini Burger Recipe in Marathi

प्रेषक Susmita Tadwalkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Mini Burger recipe in Marathi,छोटा बर्गर, Susmita Tadwalkar
छोटा बर्गरby Susmita Tadwalkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

छोटा बर्गर recipe

छोटा बर्गर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Mini Burger Recipe in Marathi )

 • ४ ब्राउन ब्रेडच्या स्लाइसेस
 • २-३ कोबीची पानं
 • ३-४ टोमॅटो च्या गोल चकत्या
 • २ उकडलेले बटाटे
 • तिखट, मिठ चवीप्रमाणे
 • १/४ चमचा पाव भाजी मसाला
 • २ लहान चमचे बटर
 • १ चमचा मेयोनीज

छोटा बर्गर | How to make Mini Burger Recipe in Marathi

 1. प्रथम ब्रेडच्या स्लाइसेस वाटीने मधोमध गोल कापून घ्या
 2. त्याच आकाराचा कोबी पण कापून घ्या
 3. उकडलेले बटाटे कुसकरुन त्यात चवीप्रमाणे तिखट, मिठ व पावभाजी मसाला घाला
 4. ब्रेड स्लाइस च्या आकाराचा पॅटीस बनवून तव्यावर तेल सोडून दोन्ही बाजूंनी भाजून घ्या
 5. आता एका स्लाइस ला बटर लावा. त्यावर कोबीचं पान ठेवा
 6. त्यावर बटाट्याचं पॅटीस ठेवा
 7. त्यावर एक टोमॅटोची चकती ठेवा
 8. वरच्या स्लाइसला मेयोनीज लावा आणि यावर ठेवा
 9. सॉसबरोबर द्या

My Tip:

कांद्याची चकती पण घालू शकतो पण डब्यात वास येतो म्हणून टाळावा कोबिऐवजी लेट्यूस पण चालेल

Reviews for Mini Burger Recipe in Marathi (0)