स्टफ बन | Stuff bun Recipe in Marathi

प्रेषक Pranali Deshmukh  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Stuff bun recipe in Marathi,स्टफ बन, Pranali Deshmukh
स्टफ बनby Pranali Deshmukh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

स्टफ बन recipe

स्टफ बन बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Stuff bun Recipe in Marathi )

 • 1 कप मैदा
 • 1 tbs ड्राय ईस्ट
 • 1 tbs साखर￰
 • मिल्क पावडर 1 tbs
 • दुध 20 ml
 • मीठ
 • 4 बटाटे
 • जिरे 1 tbs
 • अद्रक लसूण पेस्ट 1 tbs
 • ब्लॅक पेपर 1 tbs
 • 1 कांदा
 • तिखट 1/2 tbs
 • हळद 1 tbs
 • गरम मसाला 1 tbs
 • तेल 2 tbs
 • बटर 1 tbs
 • तीळ 1 tbs

स्टफ बन | How to make Stuff bun Recipe in Marathi

 1. दूध कोमट करून त्यामध्ये साखर विरघळून घ्या .
 2. ड्राय ईस्ट टाकून ईस्ट ऍक्टिव्हेट करा.
 3. दहा मिनिट बाजूला ठेवून द्या.
 4. मैद्यामध्ये मिल्कपावडर मीठ मिक्स करा .
 5. मध्ये होल करून ऍक्टिव्ह ईस्ट टाका .
 6. छान मळून घ्या ड्राय वाटल्यास थोडं दूध घालून मळून घ्या .थोडं तेल लावून मिक्स करा म्हणजे चिपकणार नाही आणि वरून सिलिकॉन पेपरने रॅप करून एक तास झाकून ठेवा .
 7. बटाटे बॉईल करून सोलून घ्या
 8. कढईत तेल टाका तेल तापले कि जिरे अद्रक लसूण पेस्ट कांदा परतवून घ्या
 9. उकडलेले बटाटे मॅश करून टाका
 10. वरून तिखट मीठ ,हळद गरम मसाला ,ब्लॅक पेपर घालून मिक्स करा .
 11. भिजवलेला मैदा साईजने दुप्पट होतो
 12. पंच करून हवा काढून थोडं मळून सॉफ्ट करा.
 13. आता उंड्याचे तुकडे कापून घ्या
 14. गोल गोळा करून बोटानी जरा पारी बनवून चमच्याने भाजी मध्ये ठेवा
 15. सगळे येजेस जोडून घ्या हातानी थोडं प्रेस करा गोल आकार द्या .वरून ब्रशनी दूध लावा म्हणजे रंग छान येईल .
 16. तीळ लावून गार्निश करा.
 17. मायक्रोवेव्ह प्रीहीट करा 200° 15 मिनिट
 18. स्टफ बन बेकिंग ट्रे मध्ये ठेवा आणि 25 मिनिट बेक करा
 19. घरी असलेल्या साहित्यापासून खूप टेस्टी बन बनवता येतो .आणि टिफिनमध्ये द्यायला पण मस्त आहे.

Reviews for Stuff bun Recipe in Marathi (0)