मुख्यपृष्ठ / पाककृती / करवंद मिर्ची

Photo of Krvand Mirchi by Vaishali Joshi at BetterButter
498
2
0(0)
0

करवंद मिर्ची

Jul-29-2018
Vaishali Joshi
10 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

करवंद मिर्ची कृती बद्दल

साध्या जेवणात चव आणणारा सोपाच पण लाजवाब तोंडी लावणारा पदार्थ

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • स्टर फ्रायिंग
  • लोणचं / चटणी वगैरे
  • लो कोलेस्टेरॉल

साहित्य सर्विंग: 4

  1. करवंद १ वाटी
  2. मिरच्या १/२ वाटी
  3. लसूण पाकळ्य़ा १५-२०
  4. कोथिंबिर
  5. तेल २ चमचे
  6. जीर १ चमचा
  7. हिंग
  8. हळद
  9. धणे पावडर
  10. मीठ चवीनुसार

सूचना

  1. करवंद दोन भागात चिरुन घ्या आणि त्यातील बिया काढून घ्या . मिरच्या चिरून लसूण सोलून ठेवा
  2. गैस वर कढईत तेल टाका तापले की जीर , हिंग घाला
  3. लसूण आणि मिर्ची घाला थोड़े परतून घ्या खूप शिजवायच नाही
  4. करवंद टाका आणि अगदी १ मिनिट परता करवंद करकरीत राहायला हवेत हळद धणे पावडर घालून मिक्स करा आणि गैस बंद करुन मीठ आणि कोथिंबीर घालून हलवून घ्या
  5. तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर