इन्स्टंट आप्पे | instant appe Recipe in Marathi

प्रेषक Seema jambhule  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • instant appe recipe in Marathi,इन्स्टंट आप्पे, Seema jambhule
इन्स्टंट आप्पेby Seema jambhule
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

2

0

इन्स्टंट आप्पे recipe

इन्स्टंट आप्पे बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make instant appe Recipe in Marathi )

 • ३/४ कप जाड रवा
 • १ कप आंबट ताक
 • १/२ टिस्पून जिरे
 • ३ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • ५-६ कढीपत्ता पाने, बारीक चिरून
 • १/४ कप कांदा, बारीक चिरून
 • १/२ टिस्पून आलेपेस्ट
 • २ चिमटी बेकिंग सोडा
 • मीठ चवीनुसार
 • तेल

इन्स्टंट आप्पे | How to make instant appe Recipe in Marathi

 1. रवा आणि ताक तासभर भिजवून ठेवावे. नंतर त्यात जिरे, मिरच्या, कढीपत्ता, आलेपेस्ट, कांदा चवीपुरते मिठ घालून मिक्स करावे.
 2. आप्पेपात्र गॅसवर गरम करत ठेवावे. मिश्रणात २ चिमूटभर सोडा घालावा आणि मिक्स करावे. 
 3. अप्पेपात्रातील प्रत्येक अर्धगोलात तेल लावून त्यात भिजवलेले पिठ घालावे.
 4. वरून झाकण ठेवून मिडीयम गॅसवर ४ ते ५ मिनीटे एक बाजू खरपूस भाजून घ्यावी. 
 5. काट्याने (फोर्क) पलटून दुसरी बाजू थोडे तेल घालून खरपूस करून घ्यावी.
 6. नारळाच्या चटणीबरोबर गरमच सर्व्ह करावे. आप्पे थंड चांगले लागत नाही.

Reviews for instant appe Recipe in Marathi (0)