वांग मसाला | Vang masala Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Vang masala recipe in Marathi,वांग मसाला, Aarti Nijapkar
वांग मसालाby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

3

0

वांग मसाला recipe

वांग मसाला बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Vang masala Recipe in Marathi )

 • वांगी लांब पातळ उभे चिरलेले ४ ते ५
 • कांदा उभा चिरलेला १मोठा
 • टोमॅटो उभा चिरलेला १ मध्यम
 • कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
 • पांढरे तीळ १ चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • जीरा १/२ लहान चमचा
 • लसूण पाकळ्या ४ ते ५
 • कडीपत्ता पाने ६ ते ७
 • लाल तिखट १ लहान चमचा
 • कांदा लसूण मसाला १ लहान चमचा
 • धणे पूड १ लहान चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार

वांग मसाला | How to make Vang masala Recipe in Marathi

 1. एका पॅन मध्ये तेल घालून त्यात जिरे मोहरी घाला तडतडली की त्यात ठेचलेला लसूण पाकळ्या व कडीपत्ता पाने घाला
 2. आता कापलेले वांग्याचे काप घाला व चांगलं तेलात परतवून घ्या
 3. चवीनुसार मीठ घाला
 4. लाल तिखट , कांदा लसूण मसाला ,धणे पूड , हळद , गरम मसाला घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या
 5. आता चिरलेला कांदा टोमॅटो व कोथिंबीर घाला व मिश्रण एकत्र करून घ्या
 6. थोडा वेळ शिजू द्या
 7. आता पांढरे तीळ घाला
 8. २ ते ३ मिनिटे शिजल्यावर गॅस बंद करा
 9. गरमागरम वांग मसाला भाजी तयार आहे

Reviews for Vang masala Recipe in Marathi (0)