मसाले भात | Masale bhaat Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masale bhaat recipe in Marathi,मसाले भात, Aarti Nijapkar
मसाले भातby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

4

0

मसाले भात recipe

मसाले भात बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masale bhaat Recipe in Marathi )

 • सुरती कोलम किंवा कोणताही तांदूळ १ वाटी
 • हिरवे वाटाणे १/३ वाटी
 • गाजर १/३ वाटी
 • बटाटा १ मोठा
 • आलं पेस्ट १ मोठा चमचा
 • लसून पेस्ट १ मोठा चमचा
 • हिरवी मिरची आणि पुदिना पेस्ट १ मोठा चमचा
 • कांदा उभा चिरले १ मोठा
 • टोमॅटो १ उभा चिरलेला मध्यम
 • कोथिंबीर ब२ मोठे चमचे
 • तेल २ मोठे चमचे
 • बटर १ मोठा चमचा
 • जिरे १ लहान चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • हिंग १/२ लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • हळद १ लहान चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • बिर्याणी मसाला १ लहान चमचा
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • जीरा धने पावडर १ मोठा चमचा
 • पाणी गरजेनुसार

मसाले भात | How to make Masale bhaat Recipe in Marathi

 1. मसाले भात
 2. तांदूळ धुवून बाजूला ठेवून ध्या
 3. आता कुकर मध्ये तेल तापवून घ्या
 4. त्यात जिरे , मोहरी , हिंग घाला मग त्यात उभा चिरलेल कांदा टोमॅटो घाला व परतवून घ्या
 5. आता आलं लसूण , कोथिंबीर आणि पुदिना पेस्ट घालून चांगलं परतवून घ्या व लालसर आणि तेल सुटलं की त्यात मसाले घाला
 6. स्वादानुसार मीठ, हळद, लाल तिखट, गरम मसाला, धणे जिरे पूड, बिर्याणी मसाला, घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्या
 7. मग हिरवे वाटाणे , बटाटे व गाजर व चिरलेली कोथिंबीर घालून मसाल्यात परतवून घ्या
 8. आता गरजेनुसार पाणी घालून उकळी येऊ द्या
 9. गॅस मंद करून त्यात भिजवलेलं तांदूळ घाला व्यवस्थित ढवळून कुकर चं झाकण लावून मध्यम आचेवर ३ ते ४ शिट्या द्या
 10. कुकर गार झाल्यावर झाकण काढा आणि गरमागरम मसालेभात तयार आहे

My Tip:

सुरती कोलम वापरला आहे तर कोणताही तांदूळ वापरू शकतो पण पाण्याने धुवून तो पाण्यात ठेवावा ५ मिनिटांकरिता

Reviews for Masale bhaat Recipe in Marathi (0)