पावभाजी | Pavbhaji Recipe in Marathi

प्रेषक Smita Koshti  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Pavbhaji recipe in Marathi,पावभाजी, Smita Koshti
पावभाजीby Smita Koshti
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

पावभाजी recipe

पावभाजी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Pavbhaji Recipe in Marathi )

 • 3 उकडलेले बटाटे ( सोलून, मॅश करुन)
 • 1 वाटी बारीक चिरून फुलकोबी
 • 1 बारीक चिरून हिरवी शिमला मिरची
 • 1 /2 वाटी हिरवे वाटाणे ( ब्लांच करून)
 • कोथिंबीर बारीक चिरून
 • 2 कांद्याची पेस्ट
 • 2 टोमॅटोची प्युरी
 • 1 चमचा आलं लसूण पेस्ट
 • 1/2 चमचा हळद
 • 3 चमचा लाल तिखट ( फिकी)
 • 2 चमचा लाल तिखट (नेहमी प्रमाणे)
 • 2 चमचे पावभाजी मसाला
 • 2 पळी तेल
 • 2 चमचे तूप

पावभाजी | How to make Pavbhaji Recipe in Marathi

 1. फुलकोबी व शिमला मिरची उकडून घ्या. तेल गरम करून त्यात कांदा पेस्ट घालून चांगले सोनेरी रंगावर परतून घ्या.
 2. आता आलं लसूण पेस्ट घालून कच्चा पणा जाईपर्यंत परतून घ्या.
 3. मग हळद, दोघ तिखट, घालून चांगले परतून घ्या तेल सुटेपर्यंत.
 4. टोमॅटो प्युरी टाकून पुन्हा तेल सुटेपर्यंत परतून घ्या.
 5. आता सर्व भाज्या फुलकोबी, बटाटे, शिमला मिरची, टाकून चांगले एकजीव करून शिजवा. शिजत असताना हळू हळू मॅश करण्यामुळे ह्याची चव छान येते.
 6. आता वटाणे टाका व मीठ, मसाला, व तुप घालुन पुन्हा एकदा परतून घ्या.
 7. चवीनुसार ,आवडीनुसार मीठ व तिखट, मसाला कमी जास्त करू शकतो.
 8. बारीक चिरलेली कोथिंबीर व तुप किंवा बटर घालून सर्व्ह करा.

My Tip:

डब्यात देताना पावाऐवजी तुपात भाजलेला पराठा द्यावा.

Reviews for Pavbhaji Recipe in Marathi (0)