रताळ्याची पोळी | SWEETPOTATO POLI Recipe in Marathi

प्रेषक आदिती भावे  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • SWEETPOTATO POLI recipe in Marathi,रताळ्याची पोळी, आदिती भावे
रताळ्याची पोळीby आदिती भावे
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  60

  मि.
 • किती जणांसाठी

  5

  माणसांसाठी

1

0

रताळ्याची पोळी recipe

रताळ्याची पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make SWEETPOTATO POLI Recipe in Marathi )

 • गहू पीठ- 2 वाट्या
 • रताळी- 6 ते7
 • गूळ - 1 वाटी
 • साखर - 1 चमचा
 • तूप - पाव वाटी
 • वेलची पावडर - 1 चमचा
 • मीठ चिमूटभर
 • तांदुळाची पीठी -पाव वाटी
 • तेल - 5 ते 6 चमचे

रताळ्याची पोळी | How to make SWEETPOTATO POLI Recipe in Marathi

 1. रताळी उकडून घ्यावी. पुरणपोळी साठी भिजवतो तशी कणिक भिजवावी. रताळी गार झाल्यावर सोलून घ्यावी. कढईत तूप 1 चमचा घालून गरम करावे. त्यात रताळी मॅश करून घालावी. परतून घ्यावीत. गूळ , साखर, वेलची पावडर घालून सारण तयार करावे. सारण व कणिक दोघांची consistancy same असावी.
 2. पुरण पोळी प्रमाणे कणकेच्या गोळ्याची वाटी करून त्यात रताळ्याचे सारण भरावे. हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी. तव्यावर तूप सोडून छान भाजून घ्यावी. खुसखुशीत पोळी होते. तुपाबरोबर खावी. 2 ते 3 दिवस टिकते. डब्यात नेण्यासाठी छान व पौष्टिक पदार्थ आहे. मुले रताळी अशीच खात नाहीत. या प्रकारे पोळी केली की आवडीने खातात.

My Tip:

यात आवडत असेल तर खोबरं पण घालू शकता.

Reviews for SWEETPOTATO POLI Recipe in Marathi (0)