ताकाची उकड | Takachi ukad Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
2 from 1 review Rate It!
 • Takachi ukad recipe in Marathi,ताकाची उकड, Aarti Nijapkar
ताकाची उकडby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

1

ताकाची उकड recipe

ताकाची उकड बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Takachi ukad Recipe in Marathi )

 • आंबट ताक २ वाटी
 • तांदुळाचे पीठ
 • लसूण पाकळ्या ४ ते ५
 • आलं १ इंच तुकडा
 • हिरव्या मिरच्या ३ ते ४
 • तेल १ चमचा
 • मोहरी १/३ लहन चमचा
 • जिरे १/३ लहान चमचा
 • हिंग १/३ लहान चमचा
 • हळद १/२ लहान चमचा
 • कडीपत्ता पाने ६ ते ७
 • मीठ स्वादानुसार
 • कोथिंबीर चिरलेली १ मोठा चमचा
 • तांदळाची भाकरी
 • तांदळाचं पीठ
 • मीठ
 • पाणी
 • शेवगाच्या पानांची भाजी
 • शेवगाची पाने १ वाटी
 • मूग १/३ वाटी
 • तेल १ मोठा चमचा
 • जिरे १ लहान चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • हिंग १/२ लहान चमचा
 • लसूण पाकळ्या ५ ते ६
 • कांदा १ मध्यम
 • टोमॅटो १ लहान
 • मीठ चवीनुसार
 • हळद १/२ लहान चमचा
 • लाल तिखट १ चमचा

ताकाची उकड | How to make Takachi ukad Recipe in Marathi

 1. कढईत तेल तापवून त्यात तेल घाला
 2. त्यात जिरे मोहरी कडीपत्ता हळद , हिंग व हिरव्या मिरच्या आणि ठेचलेला किंवा बारीक चिरलेला लसूण घाला व चांगलं परतवून घ्या
 3. ताक घालावे ताकाला उकळी येईपर्यंत ढवळत राहावे त्यामुळे ताक फाटणार नाही
 4. आता चवीनुसार मीठ घालावे व हळूहळू तांदळाचे पीठ घालावे व ढवळत राहावे
 5. एकदम पीठ घातले की हमखास गुठळ्या होतील
 6. उकळीला जेवढे पीठ पुरेसे आहे तेवढे पीठ घालावे ढवळून झाले कि त्याची वाफ काढावी
 7. तयार उकडीवर कोथिंबीर घाला ब सर्व्ह करा
 8. तांदळाच्या भाकऱ्या
 9. पाणी गरम करून पीठात घाला थोड मीठ घालून पीठ मळून घ्या मऊसर पीठ मळा
 10. तवा तापवत ठेवा तोपर्यंत परातीत भाकरी थापून घ्या
 11. तव्यावर घालून त्यावर पाणी लावून घ्या दोन्हीं बाजूनी भाकरी फुगीर भाजून घ्या
 12. शेवगाच्या पानांची भाजी
 13. मूग भिजवून थोडे शिजवून घ्या
 14. शेवग्याची पाने धुवून कापनू घ्या
 15. कढईत तेल घालून त्यात जिरे , मोहरी , हिंग , लसणाची फोडणी द्या
 16. आता चिरलेला कांदा टोमॅटो घालून चांगला परतवून घ्या
 17. मग चवीनुसार मीठ हळद ,लाल तिखट घालून परतवून घ्या आता शेवग्याची चिरलेली पाने घालून मिश्रण एकत्र करून घ्या थोडे पाणी घालून शिजवून घ्या
 18. आता मूग घालून मिश्रण एकजीव करून घ्या
 19. ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या व गॅस बंद करा

Reviews for Takachi ukad Recipe in Marathi (1)

Sharwari Vyavhare4 months ago

Nice
Reply