मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी | Masoorchi usal and Jwarichi bhakri Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Masoorchi usal and Jwarichi bhakri recipe in Marathi,मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी, Aarti Nijapkar
मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी recipe

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Masoorchi usal and Jwarichi bhakri Recipe in Marathi )

 • मसूर अकखे १/२ कप
 • कांदा चिरलेला १ मोठा
 • टोमॅटो १ चिरलेला मध्यम
 • कोथिंबीर २ मोठे चमचे
 • आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
 • तेल २ मोठे चमचे
 • जिरे १ लहान चमचा
 • मोहरी १/२ लहान चमचा
 • हिंग १/२ लहान चमचा
 • कडीपत्ता ५ ते ६ पाने
 • हळद १ लहान चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • लाल तिखट १ मोठा चमचा
 • गरम मसाला १ लहान चमचा
 • जिरे पावडर १ लहान चमचा
 • धने पावडर १/२ लहान चमचा
 • पाणी गरजेनुसार
 • ज्वारीची भाकरी
 • ज्वारीचं पीठ
 • मीठ किंचित
 • पाणी गरजेनुसार

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी | How to make Masoorchi usal and Jwarichi bhakri Recipe in Marathi

 1. मसुरची भाजी
 2. मसूर धुवून घ्या त्यात पुरेसे पाणी घालून कुकर मध्ये शिजवून घ्या २ ते ३ शिट्या द्या
 3. आता कढईत तेल तापवून त्यात तेल घाला
 4. जिरे , मोहरी ,हिंग व कडीपत्ता घालून तडतडू द्या
 5. मग त्यात चिरलेला कांदा व टोमॅटो घालून छानसं लालसर परतवून घ्या
 6. आता आलं लसूण पेस्ट घालून परतवा व झाकण ठेवून वाफवून घ्या (वाफावल्या मुळे आलं लसुण पेस्ट कढईला चिटकत किंवा जळत नाही)
 7. चांगला परतवून झाल्यावर त्यात स्वादानुसार मीठ , हळद ,लाल तिखट , गरम मसाला , धने जिरे पावडर , घालून मसाला एकजीव करून घ्या
 8. आता चिरलेली कोथिंबीर घाला म्हणजे मस्त खमंग सुटेल
 9. शिजवलेली मसूर व पाणी मसाल्यात घाला व एकजीव करून घ्या
 10. ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
 11. गरमागरम मसुरची भाजी तयार आहे
 12. पोळी , भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो
 13. ज्वारीची भाकरी
 14. ज्वारीचं पीठ ,मीठ एकत्र करून मळून घ्या परातीत गोल थापून घ्या
 15. गरम तव्यावर गाळून त्यावर पाणी लावून घ्या
 16. भाकरी दोन्हीं बाजूने भाजून घ्या
 17. लंच किंवा दुपारचे जेवण असल्यामुळे आपण पोट भरून पौष्टिक अन्न खातो त्यामुळे सोबत दही ताक कलिंगडाचे गोळे काकडी टोमॅटो बीट

My Tip:

मसुरची ह्याच पद्धतीने आमटी सुद्धा करू शकता पाण्याचं प्रमाण वाढवावं

Reviews for Masoorchi usal and Jwarichi bhakri Recipe in Marathi (0)