BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी

Photo of Masoorchi usal and Jwarichi bhakri by Aarti Nijapkar at BetterButter
0
1
0(0)
0

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी

Jul-29-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी कृती बद्दल

मसुरची उसळ आणि ज्वारीची भाकरी दुपारच्या जेवणाचा उत्तम बेत ऑफिस असो व घर टिफिन असो किंवा ताटात वाढलेलं आनंद मात्र सारखाच

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • बॉइलिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. मसूर अकखे १/२ कप
  2. कांदा चिरलेला १ मोठा
  3. टोमॅटो १ चिरलेला मध्यम
  4. कोथिंबीर २ मोठे चमचे
  5. आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा
  6. तेल २ मोठे चमचे
  7. जिरे १ लहान चमचा
  8. मोहरी १/२ लहान चमचा
  9. हिंग १/२ लहान चमचा
  10. कडीपत्ता ५ ते ६ पाने
  11. हळद १ लहान चमचा
  12. मीठ स्वादानुसार
  13. लाल तिखट १ मोठा चमचा
  14. गरम मसाला १ लहान चमचा
  15. जिरे पावडर १ लहान चमचा
  16. धने पावडर १/२ लहान चमचा
  17. पाणी गरजेनुसार
  18. ज्वारीची भाकरी
  19. ज्वारीचं पीठ
  20. मीठ किंचित
  21. पाणी गरजेनुसार

सूचना

  1. मसुरची भाजी
  2. मसूर धुवून घ्या त्यात पुरेसे पाणी घालून कुकर मध्ये शिजवून घ्या २ ते ३ शिट्या द्या
  3. आता कढईत तेल तापवून त्यात तेल घाला
  4. जिरे , मोहरी ,हिंग व कडीपत्ता घालून तडतडू द्या
  5. मग त्यात चिरलेला कांदा व टोमॅटो घालून छानसं लालसर परतवून घ्या
  6. आता आलं लसूण पेस्ट घालून परतवा व झाकण ठेवून वाफवून घ्या (वाफावल्या मुळे आलं लसुण पेस्ट कढईला चिटकत किंवा जळत नाही)
  7. चांगला परतवून झाल्यावर त्यात स्वादानुसार मीठ , हळद ,लाल तिखट , गरम मसाला , धने जिरे पावडर , घालून मसाला एकजीव करून घ्या
  8. आता चिरलेली कोथिंबीर घाला म्हणजे मस्त खमंग सुटेल
  9. शिजवलेली मसूर व पाणी मसाल्यात घाला व एकजीव करून घ्या
  10. ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या
  11. गरमागरम मसुरची भाजी तयार आहे
  12. पोळी , भाकरी किंवा भातासोबत खाऊ शकतो
  13. ज्वारीची भाकरी
  14. ज्वारीचं पीठ ,मीठ एकत्र करून मळून घ्या परातीत गोल थापून घ्या
  15. गरम तव्यावर गाळून त्यावर पाणी लावून घ्या
  16. भाकरी दोन्हीं बाजूने भाजून घ्या
  17. लंच किंवा दुपारचे जेवण असल्यामुळे आपण पोट भरून पौष्टिक अन्न खातो त्यामुळे सोबत दही ताक कलिंगडाचे गोळे काकडी टोमॅटो बीट

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर