पालक पिठलं व बाजरीची भाकरी | Palak pithle va bajrichi bhakari Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Palak pithle va bajrichi bhakari recipe in Marathi,पालक पिठलं व बाजरीची भाकरी, Aarti Nijapkar
पालक पिठलं व बाजरीची भाकरीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  30

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

9

0

पालक पिठलं व बाजरीची भाकरी recipe

पालक पिठलं व बाजरीची भाकरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Palak pithle va bajrichi bhakari Recipe in Marathi )

 • पालक पिठलं
 • पालक धुवून बारीक चिरलेली १/४ कप
 • बेसन १/४ कप
 • आलं लसूण , जिरे , मिरची पेस्ट १ मोठा चमचा
 • कोथिंबीर १ मोठा चमचा
 • मीठ स्वादानुसार
 • हळद १/२ मोठा चमचा
 • बाजरीची भाखरी
 • बाजरीचे पीठ १ कप
 • किंचित मीठ
 • गरम पाणी पीठ मळण्यासाठी

पालक पिठलं व बाजरीची भाकरी | How to make Palak pithle va bajrichi bhakari Recipe in Marathi

 1. पालक पिठलं
 2. कढईत तेल घाला त्यात आलं लसूण जिरं मिरचीची पेस्ट घालून परतवून घ्या
 3. स्वादानुसार मीठ व हळद घाला
 4. आता चिरलेली पालक घाला व परतवून घ्या
 5. बेसन घाला व मसाल्यांसोबत खरपूस भाजून घ्या
 6. आता गरम पाणी घाला व सतत ढवळत राहा म्हणजे गुठळ्या होणार नाही
 7. गॅस मंद करून पिठलं शिजवून घ्या
 8. ४ ते ५ मिनिटे वाफवून घ्या
 9. पालक पिठलं तयार आहे
 10. बाजरीची भाकरी
 11. पाणी गरम करून बाजरीच्या पिठात हवं तेवढे घालून पीठ चांगलं मळून घ्या
 12. गॅस वर तवा तापवत ठेवा
 13. आता पीठ परातीत गोलाकार थापून घ्या
 14. गरम तव्यावर अलगद ठेवून वर पाण्याचा हात लावून घ्या
 15. पाणी सुकले की भाकरी पालटून घ्या
 16. आता भाकरी व्यवस्थित भाजून घ्या
 17. भाकरी ही फुगलीच पाहिजे तर त्याची खाण्यात मज्जा आहे
 18. भाकरी आणि पालक पिठलं तयार आहे
 19. सोबत कोकमचं पाणी , ताक , मसाला कैरी ,कांदा हिरवी मिरची असे वाढा

My Tip:

पालक ब्लाँच करून त्याची पेस्ट करून पिठलं मध्ये घालू शकता

Reviews for Palak pithle va bajrichi bhakari Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo