खिचडी बाईट्स सलाद | Khichdi Bites salad Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Khichdi Bites salad recipe in Marathi,खिचडी बाईट्स सलाद, Aarti Nijapkar
खिचडी बाईट्स सलादby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

4

0

खिचडी बाईट्स सलाद recipe

खिचडी बाईट्स सलाद बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Khichdi Bites salad Recipe in Marathi )

 • तांदूळ १/२ वाटी
 • मुगाची डाळ १/३ कप
 • तूप १ मोठा चमचा
 • हळद १ लहान चमचा
 • मीठ चवीनुसार
 • पाणी खिचडी साठी लागेल तेवढे
 • सलाड
 • काकडी सोलून गोलाकार
 • टमाटर गोलाकार
 • गाजर गोलाकार
 • कांदा गोलाकार
 • खिचडी सोबत
 • ताक
 • पापड
 • लोणचे

खिचडी बाईट्स सलाद | How to make Khichdi Bites salad Recipe in Marathi

 1. खिचडी तांदूळ आणि मुगाची डाळ धुवून घ्या
 2. आता खिचडीला लागेल तेवढे पाणी घाला
 3. आता मीठ , हळद व तूप घाला
 4. गॅस वर कुकर ठेवा तूप वितळेपर्यंत ढवळत राहा
 5. तूप वितळले की मध्यम आच करुन कुकरच झाकण लावून घ्या
 6. ३ ते ४ शिटी होऊ द्या मग गॅस बंद करून कुकर गार करून घ्या
 7. खिचडी बाईट्स
 8. गार झालेले खिचडीचे गोलाकार करून ग्रिल तव्यावर तूप घालून दोन्ही बाजुंनी भाजून घ्या
 9. आता गोलाकार कापलेल्या काकडीवर खिचडी बाईट्स ठेवा त्यावर हवे तसे टोमॅटो कांदा ठेवा
 10. वरून चाट मसाला किंवा मसाला भुरभुरून घ्या
 11. अश्याप्रकारे खिचडी बाईट्स तायर आहे
 12. दही व्यवस्थित फेटून घ्या त्यात चवीपुरतं मीठ व साखर घाला
 13. दही फेठून त्यात चवीपुरतं मीठ घाला पाणी घालून ताक तयार करून घ्या
 14. पापड गॅसवर नुसते भाजून घ्या

My Tip:

खिचडीत आवडीच्या भाज्या किंवा तुपाची फोडणी देऊ शकता

Reviews for Khichdi Bites salad Recipe in Marathi (0)