गूळ तीळ पोळी | Gul til poli Recipe in Marathi

प्रेषक Aarti Nijapkar  |  29th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Gul til poli recipe in Marathi,गूळ तीळ पोळी, Aarti Nijapkar
गूळ तीळ पोळीby Aarti Nijapkar
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

7

0

गूळ तीळ पोळी recipe

गूळ तीळ पोळी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Gul til poli Recipe in Marathi )

 • गव्हाचं पीठ १ वाटी
 • मैदा २ मोठे चमचे
 • बेसन २ मोठे चमचे
 • तीळ १०० ग्रॅम
 • गूळ २०० ग्रॅम
 • शेंगदाण्याची पूड ३ मोठे चमचे
 • वेलची पूड १ लहान चमचा
 • ड्रायफ्रूईट्स पूड २ मोठे चमचे
 • तूप २ मोठे चमचे

गूळ तीळ पोळी | How to make Gul til poli Recipe in Marathi

 1. प्रथम गव्हाचं पीठ , मैदा , मीठ एकत्र करून मळून घ्या नेहमीपेक्षा नरम मला व १० मिनिटे ठेवून द्या
 2. आता कढईत तीळ व शेंगदाणे घालून भाजून घ्या मंद आचेवर भाजून घ्या खमंग येईपर्यंत मग एका ताटात काढून घ्या
 3. गार झाले की पूड करून घ्या
 4. त्याच कढईत बेसन खमंग भाजा
 5. थोडा साजूक तूप घाला व भाजा
 6. आता सर्व साहित्य व किसलेलं गूळ घालून घ्या व्यवस्थित परतवून घ्या
 7. गॅस बंद करून सारण गार करून घ्या
 8. आता कणकेचे पोळी साठीचे गोळे तयार करून त्यात सारण भरून पोळी बंद करून घ्या हलक्या हाताने पोळी लाटून घ्या
 9. गरम तव्यावर दोन्ही बाजूनी पोळी तूप लावून भाजून घ्यावी
 10. गरमागरम गुल तीळ पोळी तयार आहे वरून ड्रायफ्रूईट्स ने सजावट करा

My Tip:

पोळी लाटून त्याला कळ्या पाडल्या आहेत दिसायला छान दिसतात

Reviews for Gul til poli Recipe in Marathi (0)