साबुदाणा वडा | Sogo vada Recipe in Marathi

प्रेषक Teju Auti  |  30th Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sogo vada recipe in Marathi,साबुदाणा वडा, Teju Auti
साबुदाणा वडाby Teju Auti
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

1

0

साबुदाणा वडा recipe

साबुदाणा वडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sogo vada Recipe in Marathi )

 • १ कप साबुदाणे
 • २ मोठे बटाटे उकडून
 • ५-६ तिखट हिरव्या मिरच्या
 • १/४ कप चिरलेली कोथिंबीर
 • १/२ टिस्पून जीरे
 • १/४ ते १/२ कप शेंगदाण्याचा कूट
 • चवीपुरते मीठ
 • वडे तळण्यासाठी तेल

साबुदाणा वडा | How to make Sogo vada Recipe in Marathi

 1. साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. झाकण ठेवून ४ ते ५ तास भिजत ठेवावेत.शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.
 2. मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात.शेंगदाणे भाजून त्याची साले काढावीत आणि मिक्सरवर भरडसर बारीक करावेत.
 3. भिजवलेले साबुदाणे, बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे.
 4. भिजवलेल्या मिश्राणाचे छोटे वडे तयार करावेत.
 5. कढईत तेल गरम करावे आणि मीडियम हाय गॅस वर गोल्डन ब्राउन तळावेत.

My Tip:

वडे तळताना तेल जास्त गरम करू नये.मोठ्या फ्लेम वर तळू नये.

Reviews for Sogo vada Recipe in Marathi (0)