साबुदाणा खिचडी | Sabudana Khichdi Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sabudana Khichdi recipe in Marathi,साबुदाणा खिचडी, Shraddha Juwatkar
साबुदाणा खिचडीby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  8

  तास
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

0

0

साबुदाणा खिचडी recipe

साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sabudana Khichdi Recipe in Marathi )

 • 1 वाटी साबुदाणा
 • 1 मोठा चमचा तूप
 • 1 छोटा चमचा जिरे
 • 5/6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • 1 मध्यम बटाटा
 • 1/2 वाटी शेंगदाणे कूट
 • 1 छोटा चमचा साखर व चवीनुसार मीठ
 • 1 छोटा चमचा लिंबाचा रस
 • बारीक चिरलेली कोथिंबीर (तुम्हाला चालत असेल तर)

साबुदाणा खिचडी | How to make Sabudana Khichdi Recipe in Marathi

 1. साबुदाणे स्वच्छ धुवून घ्यावे व रात्रभर  भिजत  घालावे. साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालावे.
 2. शेंगदाणे भाजून साल काढून त्याचे कूट  करून घ्यावे 
 3. हिरव्या मिरच्या धुवून बारीक चिरून घ्यावे
 4. एका कढईमध्ये तूप गरम करावे त्यात जिरे, व बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याघालून  परतावे.
 5. बटाट्याच्या फोडी घालून लालसर परतून घ्यावे
 6. भिजवलेला साबुदाणा व शेंगदाण्याचे कूट  घालून४-५ मिनिटे परतावे.
 7. मीठ लिंबाचा रस  व साखर घालावि व झाकण ठेवून एक वाफ काढावी. लगेचच गॅसवरुन बाजूला करून त्यात  बारीक चिरलेली कोथिंबीर घालावि.

Reviews for Sabudana Khichdi Recipe in Marathi (0)