उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडी | Samo Rice Barfi Recipe in Marathi

प्रेषक Purva Sawant  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Samo Rice Barfi recipe in Marathi,उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडी, Purva Sawant
उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडीby Purva Sawant
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडी recipe

उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Samo Rice Barfi Recipe in Marathi )

 • वरीचे तांदूळ- १ कप
 • साखर / चिरलेला गुळ - १ कप 
 • वेलची पूड- १ टीस्पून
 • साजूक तूप- २ टीस्पून
 • पाणी- १ १/२ कप

उपवासाची (वरी तांदळाची) खांडवी / बर्फी / वडी | How to make Samo Rice Barfi Recipe in Marathi

 1. वरी तांदूळ निवडून, धुऊन चाळणीत निथळत ठेवावेत. पूर्ण निथळून द्यावेत. 
 2. एकीकडे पाणी गरम करत ठेवावे. 
 3. नॉन-स्टीक कढईत तूप गरम करून धुतलेले वरीचे तांदूळ गुलाबी रंगावर परतून घ्यावेत.
 4. त्यावर उकळते पाणी घालून हलवावे. झाकण ठेऊन दोन वाफा काढाव्यात. 
 5. वरी तांदूळ शिजले की ओले खोबरे, साखर / गुळ, वेलची पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेऊन वाफ काढावी. 
 6. थाळीला तूप लाऊन शिजलेले मिश्रण थापावे. 
 7. थोडे थंड झाले की त्याच्या वड्या कापाव्या

Reviews for Samo Rice Barfi Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo