साबुदाणा खीर | Sago Kheer Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  31st Jul 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sago Kheer recipe in Marathi,साबुदाणा खीर, Shraddha Juwatkar
साबुदाणा खीरby Shraddha Juwatkar
 • तयारी साठी वेळ

  0

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

साबुदाणा खीर recipe

साबुदाणा खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sago Kheer Recipe in Marathi )

 • 1/2 कप साबुदाणा
 • पाव कप साखर
 • 2 कप दूध
 • 1 टीस्पून तूप
 • 1 टीस्पून वेलचीची पूड
 • आवडीनुसार बदाम काजूचे काप

साबुदाणा खीर | How to make Sago Kheer Recipe in Marathi

 1. साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ धुवून भिजवून ठेवा. ४-५ तासांनी साबुदाणा फुगून  येईल.
 2. एका पातेल्यात दुध उकळत ठेवा. दुध उकळले कि त्यात साबुदाणा घाला. साबुदाणा अर्धवट शिजला असे वाटले कि, उरलेले दुध घाला. आणि साबुदाणा पूर्ण शिजेपर्यंत उकळत ठेवा.
 3. आता त्यात साखर,वेलची पूड घाला. मंद आचेवर दहा मिनिटे शिजवत ठेवा.
 4. दुसरीकडे एका छोट्या पातेलीत तूप गरम करा. त्यात काजू आणि बदाम गोल्डन ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग उरलेल्या तुपासकट खिरीत घालून ढवळून मग सर्व्ह करा.

My Tip:

साबुदाणा तरंगायला लागला की याचा अर्थ तो चांगला शिजला . मग गॅस बंद करावा.

Reviews for Sago Kheer Recipe in Marathi (0)