रताळ्याचे गुलाबजाम | Sweet Potato Gulab Jamun Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sweet Potato Gulab Jamun recipe in Marathi,रताळ्याचे गुलाबजाम, Lata Lala
रताळ्याचे गुलाबजामby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

रताळ्याचे गुलाबजाम recipe

रताळ्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sweet Potato Gulab Jamun Recipe in Marathi )

 • १ मध्यम आकाराचे रताळे,
 • १/४ कप पनीर किसून
 • १ १/२ टे स्पून साबुदाणा पीठ,
 • थोडे मनुके
 • मीठ चिमूटभर,
 • तळण्यासाठी तूप
 • पाकासाठी : १ कप साखर
 • १/२ कप पाणी,
 • १ टी स्पून वेलदोड्याची पावडर

रताळ्याचे गुलाबजाम | How to make Sweet Potato Gulab Jamun Recipe in Marathi

 1. प्रथम रताळी उकडून सोलून अगदी मऊ कुस्करावी.
 2. त्यामध्ये किसलेले पनीर व घट्टपणा येण्यासाठी साबुदाणा पीठ व मीठ घालून चांगले मळून घ्या
 3. त्याचे छोटे छोटे गोळे करून प्रतेक गोळयामध्ये एक-एक मनुका ठेवून परत गोळा बंद करून घ्यावा.
 4. साखर, पाणी व वेलचीपूड एकत्र करून पाक करायला ठेवा.
 5. पाक फार घट्ट नसावा.
 6. एका कढई मध्ये तूप गरम करून गोळे गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्या
 7. मग तळलेले गोळे पाकामध्ये घाला. हा पदार्थ चवीला खूप छान लागतो

Reviews for Sweet Potato Gulab Jamun Recipe in Marathi (0)