नायलॉन साबुदाणा चिवडा | Nylon Sago Chivda Recipe in Marathi

प्रेषक Shraddha Juwatkar  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
  • Nylon Sago Chivda recipe in Marathi,नायलॉन साबुदाणा चिवडा, Shraddha Juwatkar
नायलॉन साबुदाणा चिवडाby Shraddha Juwatkar
  • तयारी साठी वेळ

    0

    मि.
  • बनवण्यासाठी वेळ

    20

    मि.
  • किती जणांसाठी

    5

    माणसांसाठी

3

0

नायलॉन साबुदाणा चिवडा recipe

नायलॉन साबुदाणा चिवडा बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Nylon Sago Chivda Recipe in Marathi )

  • 250 ग्राम नायलॉनचा साबुदाणा
  • 150 ग्राम शेंगदाणे
  • काजू बदामाचे काप आवडीनुसार
  • 5/6 हिरव्या मिरच्या किंवा काळीमिरी पावडर
  • मीठ, पिठी साखर व तळण्यासाठी तेल

नायलॉन साबुदाणा चिवडा | How to make Nylon Sago Chivda Recipe in Marathi

  1. एका कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात नायलॉनचा साबुदाणा थोडा थोडा चांगला फुलेपर्यंत तळावा.तसेच शेंगदाणे ही लालसर रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावेत.
  2. आता तळलेला साबुदाणा व शेंगदाणे एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ, पिठी साखर व काळीमिरी पावडर (हिरवी मिरची नसेल तर) घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे.
  3. हिरव्या मिरच्या घालणार असाल तर बारीक तुकडे करून तेलात रंग बदले पर्यंत तळून घेणे.
  4. काजू बदामाचे काप आवडीनुसार त्यात घालावे.

My Tip:

काळीमिरी पावडर घालून चिवडा खूपच चवीष्ट लागतो.

Reviews for Nylon Sago Chivda Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo