राजगिरा क्रेम ब्रूली | Rajgira creme brulee Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  1st Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Rajgira creme brulee recipe in Marathi,राजगिरा क्रेम ब्रूली, Lata Lala
राजगिरा क्रेम ब्रूलीby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

2

0

राजगिरा क्रेम ब्रूली recipe

राजगिरा क्रेम ब्रूली बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Rajgira creme brulee Recipe in Marathi )

 • फुगवलेले राजगिरा चे बियाणे 1 कप
 • दूध 1/2 लिटर
 • अमूल क्रीम 1/2 कप
 • साखर 2-3 चमचे
 • साबुदाण्याची पावडर 2 टीस्पून
 • 4 टीस्पून दूध साबुदाणा पावडरला भिजवण्या साठी
 • व्हिनिला एस्सेन्स 1/2 टीस्पून
 • उबदार दुधात भिजवलेले केसर
 • किसलेले ताजे नारळ 1 कप
 • ब्राऊन शुगर 4 टीस्पून

राजगिरा क्रेम ब्रूली | How to make Rajgira creme brulee Recipe in Marathi

 1. कस्टर्ड बनविण्यासाठी नॉनस्टीक पॅनमध्ये 1/2 लिटर दुध गरम करा, अर्धा कप क्रीम घाला, चांगले मिसळा आणि 2 मिनिटे गरम करा.
 2. एका वाडग्यात 2 टीस्पून साबुदाणा पावडर, व्हॅनिला एस्सेन्स आणि 4 टिस्पून दूध घालून चांगले मिक्स करावे.
 3. हे कस्टर्ड मिक्स, दुध मिक्समध्ये घालून मिश्रण मिक्स होईपर्यंत शिजवा.
 4. 2 टेस्पून साखर घालून चांगले मिसळा आणि साखर पूर्णपणे वीरगळे पर्यंत शिजवा.
 5. नंतर चाळणीत चाळून घ्या आणि बाजुला ठेवा
 6. आता राजगिरा फुगवण्या साठी एक जाड कडई गरम करा
 7. उष्णता तपासण्यासाठी फक्त त्यावर काही थेंब पाणी शिंपडा आणि तडकण्याचा आवाज येतो का ते पहा
 8. तडकण्याचा आवाज इंगित करते की, राजगीरा कडइत पुरेसे गरम आहे
 9. एका वेळी 1 टिस्पून राजगीरा बिया गरम कढईत घाला
 10. कडई वरती झाकण ठेवून राजगिरा ला पुढे मागे करा
 11. राजगीरा जसा फुलेल तसा गॅस बंद करून काही वेले साठी झाकून ठेवा
 12. एका भांड्यात बाहेर काडून घेहा
 13. त्याचात राजगिरा घालून मिश्रण करून घ्या
 14. आता किसलेला ताजा नारळ घालावे
 15. कस्टर्ड मिश्रण जाड होवायला सुरू होईल सतत हलवत राहावे
 16. मिश्रण 4 स्वतंत्र बाउल मध्ये घाला आणि थंड होईपर्यंत फ्रिज मध्ये ठेवा
 17. 1 टिस्पून ब्राऊन शुगर प्रत्येक बाउल मध्ये घाला आणि चमच्याने पसरवा.
 18. साखर कॅरमलाईस करण्यासाठी:
 19. एक धातूचे चमचे घ्या, ते स्टोव्ह बर्नरवर गरम करा
 20. आणि तो साखर वरती ब्राऊन होये पर्यंत फिरवा आणि दाबून ठेवा.
 21. घट्ट झालेल्या साखरेला चमच्या चा मदतीने तोडा
 22. थंड राजगिरा क्रेम ब्रूली चा आनंद घ्या

Reviews for Rajgira creme brulee Recipe in Marathi (0)