न्युट्रेला सोया बिर्याणी | Soya Biryani Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Soya Biryani recipe in Marathi,न्युट्रेला सोया बिर्याणी, Anil Pharande
न्युट्रेला सोया बिर्याणीby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  60

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

न्युट्रेला सोया बिर्याणी recipe

न्युट्रेला सोया बिर्याणी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Soya Biryani Recipe in Marathi )

 • न्यूट्रेला सोया चन्क्स 1 कप
 • बासमती तांदूळ दीड कप
 • गाजर 1
 • कांदे 2
 • दही 1 कप
 • हळद 1 टीस्पून
 • लवंग 4
 • दालचिनी 1 इंच
 • हिरवी विलायची 4
 • शहाजीरे 1 टीस्पून
 • गायीचे तूप 3 टेबलस्पून
 • बटाटा 1
 • मीठ चवीप्रमाणे
 • आले लसूण पेस्ट दीड टीस्पून

न्युट्रेला सोया बिर्याणी | How to make Soya Biryani Recipe in Marathi

 1. प्रथम एक कप सोया चंक्स गरम पाण्यामध्ये 15 मिनिटे भिजत ठेवणे व घट्ट पिळून घेणे
 2. दीड कप बासमती तांदूळ धुवून 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवणे
 3. एक कांदा उभा चिरून तेलात ब्राउन रंगावर तळून घेणे
 4. एका बोलमध्ये एक कप दही घेणे, त्यात पाव टीस्पून हळद पावडर, एक टीस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर, एव्हरेस्ट बिर्याणी मसाला 1 टीस्पून, आले लसूण पेस्ट 1/2 टीस्पून, मीठ 1/2 टीस्पून घालून मिक्स करणे व पेस्ट स्मूथ करणे
 5. त्यामध्ये घट्ट पिळून घेतलेले सोया चन्क्स घालणे, अर्ध्या गाजराच्या फोडी करून घालणे, अर्ध्या शिमला मिरची बारीक चिरून घालणे, एक उभा चिरलेला लहान कांदा , एका बटाट्याच्या फोडी घालून एक तास मॅरीनेट करत ठेवणे
 6. प्रेशर कुकरमध्ये 2 टेबलस्पून गायीचे तूप गरम करणे
 7. त्यात लवंग, दालचिनी, विलायची, तमालपत्र, काळे मिरे, चक्रीफूल, शहाजीरे, घालणे ,
 8. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घालणे व परतणे, एक टीस्पून आले लसूण पेस्ट घालणे व परतणे
 9. त्यावर मॅरीनेट केलेले सोया व भाज्यांचा थर पसरवणे
 10. त्यावर भिजत ठेवलेले तांदूळ पसरवणे,
 11. 3/4 टीस्पून मीठ छिडकणे
 12. 3 टेबलस्पून तळलेला ब्राऊन कांदा पसरवणे
 13. 1/2 टीस्पून बिर्याणी मसाला छिडकणे
 14. 3 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर व पुदिना याचा थर देणे
 15. 1 टेबलस्पून तूप घालणे
 16. व भाताच्या बाजूने सव्वा दोन कप पाणी घालणे
 17. झाकण लावून दोन शिट्ट्या देणे
 18. स्वादिष्ट सोया बिर्याणी तयार

My Tip:

कांदा ब्राउन करण्यासाठी कांदा उभा चिरून मीठ लावून थोडया वेळाने घट्ट पिळून घेणे व नंतर तळणे लवकर ब्राउन होईल

Reviews for Soya Biryani Recipe in Marathi (0)