बैंगंन आलू की चटपटी सब्जी | Brinjal and Potato fry Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Brinjal and Potato fry recipe in Marathi,बैंगंन आलू की चटपटी सब्जी, Anil Pharande
बैंगंन आलू की चटपटी सब्जीby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

बैंगंन आलू की चटपटी सब्जी recipe

बैंगंन आलू की चटपटी सब्जी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Brinjal and Potato fry Recipe in Marathi )

 • शिजवलेले लहान बटाटे 5 ते 6
 • लहान जांभळी वांगी 150 ग्राम्स (8 नग)
 • लाल टमाटे 2
 • तेल
 • मोहरी 1/2 टीस्पून
 • जिरे 1/2 टीस्पून
 • हिंग 1/4 टीस्पून
 • कढीपत्ता 8 ते 10
 • हळद 1 टीस्पून
 • कांदे 2 बारीक चिरलेले
 • मीठ स्वादानुसार
 • काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून
 • लसूण पाकळ्या 10
 • धने जिरे पूड 2 टेबलस्पून
 • कसुरी मेथी 1 टेबलस्पून
 • गूळ 1 टेबलस्पून
 • आमचूर पावडर 1/2 टीस्पून
 • पाणी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर 3 टेबलस्पून

बैंगंन आलू की चटपटी सब्जी | How to make Brinjal and Potato fry Recipe in Marathi

 1. बटाटे स्वच्छ धुवून घेणे व शिजवून घेणे त्याच्या सालीसकट उभ्या फोडी करणे
 2. 2 लाल टमाट्याच्या मोठया फोडी करणे
 3. 2 मिडीयम साईझचे कांदे बारीक चिरून घेणे
 4. वांगी उभ्या फोडी करून पाण्यात ठेवणे
 5. एक टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर व 10 लसूण पाकळ्या मिक्सरमधून वाटून घेणे
 6. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करणे
 7. त्यात 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग, व 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालणे, परतणे
 8. त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे, 1/4 टीस्पून हळद व थोडे मीठ घालणे व परतणे
 9. त्यात वांग्याच्या फोडी घालणे, मिक्स करणे व झाकण ठेवून 2 मिनिट शिजू देणे
 10. नंतर त्यात वाटलेली मिरची व लसूण ची चटणी घालणे, मिक्स करणे, 2 टेबलस्पून धने जिरे पूड घालणे व पुन्हा 1/4 टीस्पून हळद घालणे, मिक्स करणे व दोन टेबलस्पून पाणी घालून झाकण ठेवून शिजू देणे
 11. शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी घालणे
 12. टोमॅटोच्या फोडी घालणे, हलक्या हाताने मिक्स करणे
 13. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजू देणे
 14. भाजी टेस्ट करणे
 15. 1 टेबलस्पून कसुरी मेथी हाथाने चोळून घालणे
 16. 1 टेबलस्पून गूळ घालणे
 17. 1/4 कप पाणी घालणे व थोडेसे मीठ घालणे
 18. 1/2 टीस्पून आमचूर पावडर घालणे व मिक्स करणे
 19. 2 मिनिटे झाकण ठेवून शिजू देणे
 20. चटपटीत, मसालेदार, स्वादिष्ट बैंगंन आलू सब्जी तयार
 21. चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करणे

My Tip:

बटाटे पाण्यात भिजत जेणे जेणेकरून त्याची माती निघून जाईल व नंतर 3 ते 4 पाण्याने हाताने चोळून स्वच्छ धुवून मग शिजवून घेणे

Reviews for Brinjal and Potato fry Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo