मुख्यपृष्ठ / पाककृती / बैंगंन आलू की चटपटी सब्जी

Photo of Brinjal and Potato fry by Anil Pharande at BetterButter
884
0
0.0(0)
0

बैंगंन आलू की चटपटी सब्जी

Aug-02-2018
Anil Pharande
15 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बैंगंन आलू की चटपटी सब्जी कृती बद्दल

स्वादिष्ट, चटपटीत, लज्जतदार , रंगीबेरंगी भाजी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • टिफिन रेसिपीज
  • इंडियन
  • पॅन फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. शिजवलेले लहान बटाटे 5 ते 6
  2. लहान जांभळी वांगी 150 ग्राम्स (8 नग)
  3. लाल टमाटे 2
  4. तेल
  5. मोहरी 1/2 टीस्पून
  6. जिरे 1/2 टीस्पून
  7. हिंग 1/4 टीस्पून
  8. कढीपत्ता 8 ते 10
  9. हळद 1 टीस्पून
  10. कांदे 2 बारीक चिरलेले
  11. मीठ स्वादानुसार
  12. काश्मिरी लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून
  13. लसूण पाकळ्या 10
  14. धने जिरे पूड 2 टेबलस्पून
  15. कसुरी मेथी 1 टेबलस्पून
  16. गूळ 1 टेबलस्पून
  17. आमचूर पावडर 1/2 टीस्पून
  18. पाणी
  19. बारीक चिरलेली कोथिंबीर 3 टेबलस्पून

सूचना

  1. बटाटे स्वच्छ धुवून घेणे व शिजवून घेणे त्याच्या सालीसकट उभ्या फोडी करणे
  2. 2 लाल टमाट्याच्या मोठया फोडी करणे
  3. 2 मिडीयम साईझचे कांदे बारीक चिरून घेणे
  4. वांगी उभ्या फोडी करून पाण्यात ठेवणे
  5. एक टेबलस्पून काश्मिरी लाल मिरची पावडर व 10 लसूण पाकळ्या मिक्सरमधून वाटून घेणे
  6. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करणे
  7. त्यात 1/2 टीस्पून मोहरी, 1/2 टीस्पून जिरे, 1/4 टीस्पून हिंग, व 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालणे, परतणे
  8. त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे, 1/4 टीस्पून हळद व थोडे मीठ घालणे व परतणे
  9. त्यात वांग्याच्या फोडी घालणे, मिक्स करणे व झाकण ठेवून 2 मिनिट शिजू देणे
  10. नंतर त्यात वाटलेली मिरची व लसूण ची चटणी घालणे, मिक्स करणे, 2 टेबलस्पून धने जिरे पूड घालणे व पुन्हा 1/4 टीस्पून हळद घालणे, मिक्स करणे व दोन टेबलस्पून पाणी घालून झाकण ठेवून शिजू देणे
  11. शिजवलेल्या बटाट्याच्या फोडी घालणे
  12. टोमॅटोच्या फोडी घालणे, हलक्या हाताने मिक्स करणे
  13. झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे शिजू देणे
  14. भाजी टेस्ट करणे
  15. 1 टेबलस्पून कसुरी मेथी हाथाने चोळून घालणे
  16. 1 टेबलस्पून गूळ घालणे
  17. 1/4 कप पाणी घालणे व थोडेसे मीठ घालणे
  18. 1/2 टीस्पून आमचूर पावडर घालणे व मिक्स करणे
  19. 2 मिनिटे झाकण ठेवून शिजू देणे
  20. चटपटीत, मसालेदार, स्वादिष्ट बैंगंन आलू सब्जी तयार
  21. चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करणे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर