मटकीची उसळ | Sprouted matki fry Recipe in Marathi

प्रेषक Anil Pharande  |  2nd Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Sprouted matki fry recipe in Marathi,मटकीची उसळ, Anil Pharande
मटकीची उसळby Anil Pharande
 • तयारी साठी वेळ

  8

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  10

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

1

0

मटकीची उसळ recipe

मटकीची उसळ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Sprouted matki fry Recipe in Marathi )

 • मोड आलेली मटकी 250 ग्राम्स
 • बारीक चिरलेला कांदा १
 • हिंग चिमूटभर
 • आले लसूण हिरवी मिरची पेस्ट १ टेबलस्पून
 • काश्मिरी लाल मिरची पावडर १ टीस्पून
 • धने पावडर १ टीस्पून
 • जिरे पावडर १ टीस्पून
 • मीठ चवीप्रमाणे
 • तेल
 • चिरलेली कोथिंबीर २ टेबलस्पून गार्निश साठी

मटकीची उसळ | How to make Sprouted matki fry Recipe in Marathi

 1. प्रथम कुकरमध्ये १ टेबलस्पून तेल गरम करा
 2. त्यात आले,लसूण,हिरवी मिरची याची पेस्ट घाला व परता
 3. त्यात चिरलेला कांदा घाला व परतून घ्या
 4. चिमूटभर हिंग घाला,
 5. कांदा मऊ झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर, मीठ घालून परतून घ्या
 6. मोड आलेली मटकी घाला व परतुन त्यात एक कप पाणी घाला व कुकरचे झाकण लावून तीन शिट्ट्या द्या
 7. कुकर थंड झाल्यानंतर सर्व्हिंग डिशमध्ये काढून त्यात चिरलेल्या कोथिंबीरने गर्निश करा

Reviews for Sprouted matki fry Recipe in Marathi (0)