BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / बटाटा पुरी

Photo of POTATO PURI by Samiksha Mahadik at BetterButter
151
2
0(0)
0

बटाटा पुरी

Aug-03-2018
Samiksha Mahadik
0 मिनिटे
तयारीची वेळ
35 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटाटा पुरी कृती बद्दल

Yummy

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मोठे बटाटे उकडून
  2. अर्धा कप साबुदाणा
  3. 7 ते 8 हिरव्या मिरच्या
  4. अर्धा कप कोथिंबीर
  5. अर्धा चमचा जिरे
  6. 3 चमचे शेंगदाणा कूट
  7. 1 चमचा जिरेपूड
  8. 2 चमचे शिंगाडा पीठ
  9. मीठ
  10. तेल

सूचना

  1. अर्धा कप साबुदाणा पाण्यात भिजवावा जास्तीचे पाणी काढून टाकावे साबुदाण्याच्या वर किंचित पाणी ठेवावे 3 ते 4 तास भिजवून ठेवावे
  2. मिक्सरमध्ये मिरची, कोथिंबीर, जिरे आणि मीठ घालून पाणी न घालता बारीक वाटावे
  3. शिजवलेले बटाटे किसून घ्यावे त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा, शेंगदाणा कूट, भिजवलेला साबुदाणा, शिंगाडा पीठ, जिरेपूड आणि मीठ घालून नीट गोळा मळुन घ्या
  4. प्लॅस्टिक च्या तुकडा घेऊन त्यावर बटाट्याच्या छोटा गोळा घेऊन जाडसर थापावा आणि मधोमध भोक पडावे
  5. पुरी पातळ थापू नये नाहीतर तेलात टाकल्यावर तुटते किंवा विरघळते
  6. जाडसर पुरी बनवून गरम तेलात मध्यम आचेवर तळावी
  7. पुरी तेलात टाकल्यावर झाऱ्याने लगेच अजिबात पालटू नये नाहीतर तुटू शकते
  8. झऱ्याच्या साहाय्याने अलगद तेलात बुडवावी म्हणजे वरच्या बाजूलाही छान ब्राउन रंग येईल
  9. बटाटा पुरी दह्यासोबत सर्व्ह करावी

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर