टब टिम ग्रोब | Tub tim grob( Red rubies thai dessert) Recipe in Marathi

प्रेषक Lata Lala  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Tub tim grob( Red rubies thai dessert) recipe in Marathi,टब टिम ग्रोब, Lata Lala
टब टिम ग्रोबby Lata Lala
 • तयारी साठी वेळ

  20

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

2

0

टब टिम ग्रोब recipe

टब टिम ग्रोब बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tub tim grob( Red rubies thai dessert) Recipe in Marathi )

 • शिंगाडे 12 नग
 • साबुदाणा पीठ 3/4 कप
 • स्ट्राबेरी क्रश 3 - 4 टेबल स्पून
 • नारळाचं दूध 1 कप
 • साखरेचे पाक बनविण्यासाठी :
 • साखर 1 कप
 • पाणी 1 कप
 • चिमूटभर मीठ
 • चिमूटभर लाल खाण्याचा रंग

टब टिम ग्रोब | How to make Tub tim grob( Red rubies thai dessert) Recipe in Marathi

 1. शिंगाडे सोलून चोकोनी तुकडे करून घ्या.
 2. सुमारे 10 मिनिटांसाठी ते स्ट्रॉबेरी क्रश आणि लाल रंगामध्ये भिजवा.
 3. बाहेर काढून साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवा
 4. साबुदाण्याच्या पिठात १० मिनिटं ठेवून द्या
 5. चाळणीत घालून जास्तीचं पीठ काढून टाका
 6. स्टोव्हवर पाण्याने भरलेले एक खोल भांडे ठेवावे
 7. पाणी उकळण्यास सुरवात झाली कि लेप केलेले शिंगाडे त्याचात घाला
 8. 3-4 मिनिटांनंतर शिंगाडे पाण्यात वर यायला लागतील
 9. काही सेकंदासाठी उकळा
 10. बर्फाच्या पाण्याने भरलेली एक वाटी तयार ठेवा
 11. शिंगाडा गाळून ते थंड पाण्यात घाला.
 12. वेगळ्या पॅनमध्ये 1 कप पाणी आणि 1 कप साखर घाला.
 13. साखर वितळे पर्यंत उकळू द्या . सतत ढवळत राहा .
 14. ज्योत बंद करून त्यात नारळचे दूध घाला.
 15. जर गॅस फास्ट असेल तर नारळ दूध फाटण्याची शक्यता जास्त असते.
 16. गॅस चालू करून ज्योत कमी ठेवा
 17. सतत ढवळत राहा जेणेकरून सिरप आणि नारळाचे दूध छान एकजीव होईल .
 18. मिश्रण घट्ट व्हायला लागेल . काही मिनिटे ढवळणे.
 19. थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.
 20. ग्लासमध्ये टाकून फ्रिजमध्ये काही वेळ थंड होण्यासाठी ठेवावे
 21. आपण या सर्व्ह करताना त्यास लाल शिंगाडे चे तुकडे घालावे

My Tip:

हे तुम्ही कोमट किवां थंड खाऊ शकता

Reviews for Tub tim grob( Red rubies thai dessert) Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo