मुख्यपृष्ठ / पाककृती / टब टिम ग्रोब

Photo of Tub tim grob( Red rubies thai dessert) by Lata Lala at BetterButter
1218
3
0.0(0)
0

टब टिम ग्रोब

Aug-04-2018
Lata Lala
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टब टिम ग्रोब कृती बद्दल

ही थाईलॅन्ड देश ची गोड पाककृती आहे. हे शिंगाडे आणि नारळाचं दुध वापरून बनवले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • नवरात्र
  • थाई
  • बॉइलिंग
  • चिलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. शिंगाडे 12 नग
  2. साबुदाणा पीठ 3/4 कप
  3. स्ट्राबेरी क्रश 3 - 4 टेबल स्पून
  4. नारळाचं दूध 1 कप
  5. साखरेचे पाक बनविण्यासाठी :
  6. साखर 1 कप
  7. पाणी 1 कप
  8. चिमूटभर मीठ
  9. चिमूटभर लाल खाण्याचा रंग

सूचना

  1. शिंगाडे सोलून चोकोनी तुकडे करून घ्या.
  2. सुमारे 10 मिनिटांसाठी ते स्ट्रॉबेरी क्रश आणि लाल रंगामध्ये भिजवा.
  3. बाहेर काढून साबुदाण्याच्या पिठामध्ये घोळवा
  4. साबुदाण्याच्या पिठात १० मिनिटं ठेवून द्या
  5. चाळणीत घालून जास्तीचं पीठ काढून टाका
  6. स्टोव्हवर पाण्याने भरलेले एक खोल भांडे ठेवावे
  7. पाणी उकळण्यास सुरवात झाली कि लेप केलेले शिंगाडे त्याचात घाला
  8. 3-4 मिनिटांनंतर शिंगाडे पाण्यात वर यायला लागतील
  9. काही सेकंदासाठी उकळा
  10. बर्फाच्या पाण्याने भरलेली एक वाटी तयार ठेवा
  11. शिंगाडा गाळून ते थंड पाण्यात घाला.
  12. वेगळ्या पॅनमध्ये 1 कप पाणी आणि 1 कप साखर घाला.
  13. साखर वितळे पर्यंत उकळू द्या . सतत ढवळत राहा .
  14. ज्योत बंद करून त्यात नारळचे दूध घाला.
  15. जर गॅस फास्ट असेल तर नारळ दूध फाटण्याची शक्यता जास्त असते.
  16. गॅस चालू करून ज्योत कमी ठेवा
  17. सतत ढवळत राहा जेणेकरून सिरप आणि नारळाचे दूध छान एकजीव होईल .
  18. मिश्रण घट्ट व्हायला लागेल . काही मिनिटे ढवळणे.
  19. थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.
  20. ग्लासमध्ये टाकून फ्रिजमध्ये काही वेळ थंड होण्यासाठी ठेवावे
  21. आपण या सर्व्ह करताना त्यास लाल शिंगाडे चे तुकडे घालावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर