उपवासाची कढी आणि भगर पुलाव | Upwasa chi kadhi ani bagar pulav Recipe in Marathi

प्रेषक Rohini Rathi  |  4th Aug 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Upwasa chi kadhi ani bagar pulav recipe in Marathi,उपवासाची कढी आणि भगर पुलाव, Rohini Rathi
उपवासाची कढी आणि भगर पुलावby Rohini Rathi
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  2

  माणसांसाठी

1

0

उपवासाची कढी आणि भगर पुलाव recipe

उपवासाची कढी आणि भगर पुलाव बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Upwasa chi kadhi ani bagar pulav Recipe in Marathi )

 • उपवासाची कढी साठी
 • दही एक कप
 • राजगिऱ्याचे पीठ दोन टेबल स्पून
 • मीठ चवीनुसार
 • तेल एक टीस्पून
 • शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर
 • दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
 • जीरे फोडणीसाठी अर्धा टी स्पून
 • भगर पुलाव बनवण्यासाठी
 • भगर एक वाटी
 • तेल एक टी स्पून
 • लाल मिरची पावडर अर्धा टी स्पून
 • मीठ चवीनुसार
 • शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी
 • बारीक चिरलेली कोथिंबीर

उपवासाची कढी आणि भगर पुलाव | How to make Upwasa chi kadhi ani bagar pulav Recipe in Marathi

 1. सर्वप्रथम दह्यामध्ये राजगिऱ्याचे पीठ एकत्र करून मिश्रण बनवून घ्यावे
 2. पॅनमध्ये तेल गरम करून िर्‍याची फोडणी घालून हिरवी मिरची घालावी
 3. नंतर तयार मिश्रण त्यात घालून सतत हलवावे
 4. शेंगदाण्याचा कूट मीठ व थोडे अर्धा कप पाणी घालावे
 5. मिश्रण उकळल्यानंतर त्यात कोथिंबीर घालावी
 6. भगर चा पुलाव बनवण्यासाठी भगर स्वच्छ धुवून घ्यावी
 7. कढईत तेल गरम करून जिरे ची फोडणी लाल मिरची पावडर व पाणी घालून घ्यावे
 8. चवीनुसार पाणी घालून पाणी उकळल्यानंतर भगर घालून झाकण ठेवून भगर शिजवून घ्यावी
 9. तयार भगर पुलावर ती बारीक चिरलेली कोथंबीर घालून घ्यावी
 10. अशाप्रकारे भगर पुलाव व उपवासाची कडी उपवासाचा डोसा राजगिऱ्याचे लाडू बरोबर सर्व करावी

My Tip:

कडी मध्ये एक चमचा साखर घातली तरीही कळी स्वादिष्ट लागते

Reviews for Upwasa chi kadhi ani bagar pulav Recipe in Marathi (0)

Cooked it ? Share your Photo